शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाढल्या मंदिरातील फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:14 IST

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची मनधरणी रत्नागिरीत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी झालं गेलं सारे विसरून तू मला मदत कर अशी विनंतीही केली जात आहे. त्याला विरोधी उमेदवाराने समर्थन देताच त्याला कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या काळात मंदिराच्या फेऱ्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज छाननीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या उमेदवारांची निश्चिती झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी अनेक ठिकाणी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, सारे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या सहकार्याची अपेक्षा केली जात आहे.रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा विडा उचलला आहे. हक्काच्या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने ह्यसाम, दाम, दंडह्ण पणाला लावण्याची तयारी ठेवली आहे. निवडणुकीत त्याच-त्याच उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात असल्याने नाराजीचा सूर आळवला जात आहे. त्याचाच फायदा उचलण्यासाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने काही ठिकाणी विद्यमान सदस्यांना उमेदवारी न दिल्याने बंडखोरीची शक्यता अधिक आहे.शिवसेनेच्या काही सदस्यांनी विरोधी उमेदवारांची मनधरणी करण्यासही सुरुवात केल्याची चर्चा आहे. ह्यझालं गेलं सारे विसरून जा आणि मला मदत करह्ण, अशी विनवणीच उमेदवारांकडून करण्यात येत आहे. विरोधी उमेदवारानेही होला हो देताच ह्यचल मग मंदिरात जाऊन मी तुला साथ देतोय असे सांगह्ण, असा हट्टच धरला जात आहे. उमेदवारांना मंदिरात नेऊन तेथे कबुलीजबाब देण्याची गळ घातली जात आहे. त्यामुळे सध्या मंदिरात जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.सरपंचपदाची आखणीसरपंचपदाचे आरक्षण काय पडणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. आरक्षणाचा पत्ता नसला तरी काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत. त्यांनी बेरजेचे गणित करत सदस्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विरोधी गटातील उमेदवारांनाही गळ घातली जात आहे.पार्ट्या झडू लागल्यामतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसा रात्रीचा प्रचार करण्यावर जोर दिला जात आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या पार्ट्या करून मतदारांना खूश केले जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी पुढाकार घेतल्याचीही चर्चा रंगत आहे.छुपा प्रचारशिवसेनेने काहींचे पत्ते कापल्यानंतर त्यांनी विरोधी गटात शिरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाला उघडउघड विरोध न करता छुपेपणे प्रचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे त्याचा फटकाही शिवसेनेला बसण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक