शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आय. सी. एस. ग्रंथालयाच्या स्मार्टपेजला आली परदेशातूनही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:00 IST

College Khed Ratnagiri -लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देआय. सी. एस. ग्रंथालयाच्या स्मार्टपेजला आली परदेशातूनही मागणीसंस्थेसाठी अभिमानास्पद : मंगेश बुटाला

खेड : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे.ग्रंथालयाची वेबसाईट, वेबपेज, न्यूज रिपॉझिटरी, फोटो गॅलरी, नोटीस, युट्यूब चॅनेल, मोबाईल ॲप, लायब्ररीयन ब्लॉग अशा अनेक बाबी एकाच पेजवर उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रंथालयाबाबतची सर्व माहिती येथे उपलब्ध आहेच, शिवाय वाचकांसाठी ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉगही देण्यात आले आहे.

हे स्मार्टपेज मोबाईलवर विद्यार्थ्यांना अगदी सहजरित्या वापरता येण्याजोगे व आकर्षक आणि कल्पक असे बनवले गेले आहे. या स्मार्टपेजची कल्पना आवडल्याने दक्षिण आफ्रिकेतील एस. आय. एम. टी. ॲक्रा, घाना या संस्थेने सहजीवन शिक्षण संस्थेकडे या स्मार्टपेजची कल्पना आपल्या संस्थेत वापरण्याची रितसर परवानगी मागितली आहे. संस्थेचे रजिस्ट्रार जोसेफ डंकी यांनी हे पत्र पाठवले असून, याच मागणीपत्रात हे स्मार्ट पेज बनवणाऱ्या ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांचे अभिनंदनही केले आहे.लवकरच सहजीवन शिक्षण संस्थेकडून अशा प्रकारचे स्मार्टपेज वापरण्यासाठी परवानगी देणारे पत्र एस. आय. एम. टी. घाना या संस्थेस दिले जाणार आहे. तसेच ग्रंथपालांकडून त्यांना तांत्रिक सहाय्यही पुरवले जाणार आहे. एवढेच नव्हे तर मागणी केल्यास ज्या महाविद्यालयांना अशा प्रकारच्या स्मार्ट पेजची निर्मिती करायची असेल तर त्यांनाही सहाय्य केले जाईल, असे संस्थेकडून सांगण्यात आले.या स्मार्ट पेजच्या उद्घाटन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, सचिव मंगेश बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग यांनी कौतुक केले होते. आता पुन्हा प्राचार्य व सर्व संस्था पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.संस्थेसाठी अभिमानास्पद : मंगेश बुटालाआपल्या संस्थेच्या महाविद्यालयात अशा प्रकारचे स्मार्ट पेज बनवले जाणे आणि त्याला परदेशातूनही मागणी येणे, ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे संस्थेचे सेक्रेटरी मंगेशभाई बुटाला यांनी सांगितले. या स्मार्ट पेजच्या निमित्ताने संस्था व महाविद्यालयाची ओळख परदेशापर्यंत झाली, ही भूषणावह आणि आनंदाची बाब आहे, असे महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले म्हणाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयlibraryवाचनालयRatnagiriरत्नागिरीKhedखेड