शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ४,३०७ शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात

By शोभना कांबळे | Updated: April 11, 2024 17:53 IST

२५५ शस्त्रे अपवादात्मक वगळली

रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी - सिंदुधुर्ग मतदार संघात आत्मसंरक्षण तसेच शेती संरक्षणासाठी असलेल्या एकूण ७,५४८ परवानाधारक शस्त्रांपैकी ४,३०७ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. अपवादात्मक काही बॅंका तसेच विशेष व्यक्ती यांना सवलत देण्यात आली असून एकूण २५५ शस्त्रे ही जमा करण्यात आलेली नाहीत.कोणत्याही निवडणुकीवेळी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, यासाठी उमेदवार आणि मतदार यांच्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात येते. या आचारसंहितेच्या नियमांचे पालन काटेकोररित्या करण्यासाठी अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांकडे दिली जाते. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून ते मत मोजणीपर्यंत आचारसंहितेचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक असते.निवडणुकीच्या काळात कुठल्याही बाबीमध्ये नागरिक किंवा उमेदवारांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणुन ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, ती सर्व शस्त्रे पोलिस विभागाकडे जमा करावी लागतात. शस्त्रे बाळगणाऱ्यांना शस्त्रे घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने परवाना मिळतो. त्यासाठी पोलिस विभागाकडून त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेतली जाते. त्यानंतरच त्याला शस्त्र परवाना मिळतो. शेती संरक्षणासाठी आणि आत्म संरक्षणासाठी अशा दोन प्रकारची शस्त्रे असतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदार संघातील एकूण ७,५४८ शस्त्रांपैकी ४,३०७ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.जिल्ह्यातील विविध प्रकारची शस्त्रे बाळगणारे ३०८३ शस्त्रधारक आहेत. त्यापैकी २८६६ जणांना शस्त्रे जमा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५५९ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. बॅंका तसेच अपवादात्मक व्यक्ती अशा २१७ जणांना यातून वगळण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४४६५ शस्त्रधारक आहेत. त्यापैकी ४३८९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यापैकी २०३५ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहे तर ३८ जणांना सवलत देण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील मिळून ७२५५ शस्त्रे बुधवार, दि. १० एप्रिलपर्यंत प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत. २५५ जणांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे.शुक्रवार, दि. १२ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात होणार आहे. तोपर्यंत शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlok sabhaलोकसभाCode of conductआचारसंहिताPoliceपोलिस