शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: भांडणाच्या रागात मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून केला खून 

By मनोज मुळ्ये | Updated: October 13, 2023 18:43 IST

गणपतीपुळे : घरगुती भांडणाच्या रागातून वडिलांच्या डाेक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केल्याची खळबळजनक घटना निवेंडी- वरची समतानगर (ता. ...

गणपतीपुळे : घरगुती भांडणाच्या रागातून वडिलांच्या डाेक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केल्याची खळबळजनक घटना निवेंडी- वरची समतानगर (ता. रत्नागिरी) येथे घडली. सुरेश नावजी कदम (५८) असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा राजेश सुरेश कदम (३८) याला जयगड पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (१२ ऑक्टाेबर) रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.निवेंडी वरची समतानगर येथे सुरेश कदम हे आपला मुलगा राजेश व मुलगी सुषमा असे एकत्रित राहत होते. घरगुती कारणावरून गुरुवारी रात्री सुरेश कदम व मुलगा राजेश यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन राजेश याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्यात ते जागीच कोसळले. ते उठत नसल्याचे पाहून राजेशने आपला चुलत भाऊ विनेश कदम याला घरी बोलावून आणले. विनेश कदम यांनी पाहिले असता सुरेश कदम हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले.याविषयीची विनेश कदम यांनी तत्काळ निवेंडीचे पोलिस पाटील दिवाकर कदम यांना माहिती दिली. पोलिस पाटील कदम यांनी तत्काळ सरकारी रुग्णवाहिका बोलावून सुरेश कदम यांना खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिसांनी राजेश कदम याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी