शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत भोंग्याच्या आवाजाच्या नियंत्रणासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:55 IST

राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी : राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रत्नागिरी शहर पोलीस स्थानकांतर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वधर्मीय लोक एकोप्याने राहतात. त्यांच्यातील हा सलोखा कायम राहावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीकरांना केले आहे. पोलीस मुख्यालयात शांतता कमिटीची बैठक आयाेजित केली हाेती. यावेळी ३ मे रोजी रमजान ईद, अक्षय तृतीया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत.

यावेळी मुस्लिम समाजातर्फे रफिक बिजापूरकर यांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी वेळात व कमी आवाजात अजान दिली जाईल तर इतर वेळीही मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत होणार असल्याचे रफिक बिजापूरकर यांनी सांगितले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनीही रत्नागिरीत हिंदू-मुस्लिम बांधव लहानपणापासून एकत्रित राहत आहेत. भोंग्याचा आवाज मर्यादित झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही. आम्ही सर्व समाजाचे बांधव एकत्रितपणे आमचे सण, उत्सव साजरे करणार असल्याचे स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक वास्तव्याला आहेत. परजिल्ह्यासह राज्यात, देशात कोणतीही अनुचित घटना घडली तरीही येथील सर्वधर्मीयांचा सलोखा यापूर्वीही कायम राहिला आहे, यापुढेही कायम राहील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.या बैठकीला श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, आरपीआयचे एल. व्ही. पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, व्यावसायिक महेश गुंदेचा, मराठा मंडळाचे केशवराव इंदुलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर तर पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) शिवाजी पाटील, शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस हेड काॅन्स्टेबल महेश कुबडे, कर्मचारी नेते सुधाकर सावंत, सतीश राणे, पत्रकार राजेंद्र चव्हाण, हेमंत वणजू, तन्मय दाते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuslimमुस्लीमHinduहिंदू