शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर, सागरी सुरक्षाही बळकट होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:25 IST

ड्रोन हे सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार

रत्नागिरी : अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली राबविण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन करण्यात आले. परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर चाप लागणार आहे. तसेच सागरी सुरक्षाही बळकट होणार आहे.यापुढे पालघरमधील शिरगाव, ठाण्यामधील उत्तन, मुंबई उपनगरातील गोराई, मुंबई शहरमधील ससून गोदी, रायगडमधील वर्सोली व श्रीवर्धन, रत्नागिरीमधील भाट्ये व मिरकरवाडा, सिंधुदुर्गमधील देवगड या नऊ ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे. येथील भाट्ये समुद्रकिनारी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ड्रोन हवेत समुद्रावर झेपावला.याप्रसंगी मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पारंपरिक मच्छीमारांचे हित जोपासण्यासाठी तसेच परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी रोखण्यासाठी असलेल्या कायद्यांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांद्वारे गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते.गस्तीनौकेद्वारे समुद्रामध्ये गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही; पण ड्रोनच्या वापरामुळे नियंत्रण राखण्यास मदत होईल. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिक क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येईल. तसेच ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभाग सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकेल. ड्रोन हे सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहे.ट्रॉलर नेटद्वारे मासेमारी, पर्ससिन पद्धतीने मासेमारी, गिल नेट पद्धतीने मासेमारी, एलइडी/डायनामाईट/रसायने वापरुन करण्यात येणारी अवैध पद्धतीची मासेमारी, नोंदणीकृत नौका क्रमांक, नाव व जिल्ह्याचा कलर कोड यांची नोंद नसलेल्या मासेमारी नौका, पावसाळी बंदी कालावधी (१ जून ते ३१ जुलै)मध्ये अवैधरित्या मासेमारी करत असलेल्या यांत्रिक नौकांची (मोटाराइज/मेकॅनाइज) तपासणी, हवामान इशारे तसेच अवैध बाबीबर संबंधित अंमलबजावणी अधिकारी कारवाई करू शकतील.कर्नाटकातील मलपी येथील अतिक्रमण करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई करत ताब्यात घेणाऱ्या नौका विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार