शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही वाळू उपसा - चिपळुणातील गोवळकोट परिसरात बेकायदा वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:07 IST

या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

ठळक मुद्दे९ बोटींना जलसमाधी गुरूवारी रात्री करण्यात आली कारवाई

चिपळूण : कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही चिपळूण तालुक्यातील गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपशाचे काम करण्यात येत असल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी केलेल्या धडक कारवाईत सुमारे दोन - दोन ब्रास असलेल्या बेवारस ९ बोटींना जलसमाधी देण्यात आली. ही कारवाई गुरूवारी रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्याने करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला व विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य वाहतूक व बेकायदा व्यवसायांवर प्रशासनाची नजर आहे. गोवळकोट खाडी भागात संचारबंदी काळातही राजरोस वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी आणि नायब तहसीलदार शेजाळ यांनी तत्काळ गोवळकोट येथील नदीपात्रात ही कारवाई केली.गोवळकोट खाडीत अधिकाऱ्यांचे पथक येत असल्याची माहिती मिळताच बोटीवरील लोकांनी बोटी किनाऱ्यावर ठेवून पलायन केले. त्यामुळे या कारवाईत कोणीही हाती लागले नाही. या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी