शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाच्या काळात पक्षाने दुर्लक्ष केले, शिवसेनेत प्रवेश करताच सुदेश मयेकर यांनी व्यक्त केली खंत

By मनोज मुळ्ये | Updated: January 10, 2024 13:59 IST

शरद पवार तसेच अजित पवार यांचे कायम ऋणी राहू

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना आपण आजारी असताना होतो. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने, पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने आपली साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत सुदेश मयेकर यांनी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी विरुद्ध पक्षात असतानाही मंत्री उदय सामंत आणि त्यांचे भाऊ शिवसेनेचे नेते किरण सामंत या दोघांनीही आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला चांगला आधार दिला. त्यामुळे यापुढे आपण त्यांनाच साथ देणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.सुदेश मयेकर यांनी बुधवारी पाली येथे मंत्री सामंत यांच्या निवासस्थानी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. अजित पवार यांनी स्वतंत्र गट केल्यानंतरही आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कायम राहिलो. त्यावेळी आपल्याला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद दिले गेले. केवळ जिल्हाध्यक्ष पदच नाही तर नगरसेवकासह अनेक पदे आपल्याला पक्षाने दिली. त्यासाठी आपण शरद पवार तसेच अजित पवार यांचे कायम ऋणी राहू.मात्र जिल्हाध्यक्ष असताना आपण फार मोठ्या आजारपणातून गेलो आणि त्या काळात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने किंवा पदाधिकाऱ्याने आपली साधी विचारपूसही केली नाही. त्यावेळी मंत्री उदय सामंत किरण सामंत हे मात्र आपण आणि आपल्या कुटुंबासोबत कायम होते. त्यांनी खूप मोठा आधार दिला. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख यांच्या जोडीने रत्नागिरी शहर आणि तालुक्यात पक्षवाढीवर आपला सर्वाधिक भर असेल, असेही मयेकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना