शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मी आता राष्ट्रवादीत सक्रिय : माजी आमदार रमेश कदम यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 16:35 IST

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर बाजूला करण्यात आलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आता राष्ट्रवादीत सक्रिय होण्याची घोषणा केली आहे. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम निवडणुकीनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमी आता राष्ट्रवादीत सक्रिय माजी आमदार रमेश कदम यांची घोषणा

चिपळूण : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर बाजूला करण्यात आलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आता राष्ट्रवादीत सक्रिय होण्याची घोषणा केली आहे. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम निवडणुकीनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मूळचे काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या रमेश कदम यांनी चिपळूणचे नगराध्यक्ष पद भुषवले आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर रमेश कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. २00४ साली ते राष्ट्रवादीकडून चिपळूणचे आमदार झाले. मात्र भास्कर जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर चिपळूणमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू झाले.

या वादाच्या पार्श्वभूमीवर २00९ मध्ये रमेश कदम यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवली. त्यात ते सुनील तटकरे यांच्याविरोधात उभे होते.शेकापमध्ये ते फार काळ राहिले नाहीत. २00९च्या निवडणुकांनंतर ते मुख्य प्रवाहात नव्हते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र आठच महिन्यात त्यांनी भाजपला रामराम केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले.

मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांना अचानक या पदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रशसचे खासदार हुसेन दलवाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आपण पुढे काय करणार, हे स्पष्ट केले नव्हते.गुरूवारी कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन, आता आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होत असल्याचे सांगितले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला फोन केला होता. तुमच्यासारखी माणसे राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्याशीही आपली चर्चा झाली. आपण आता शेखर निकम यांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ramesh Kadamरमेश कदमRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस