शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा - दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2023 18:48 IST

राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला असल्याची टीका हुसेन दलवाई यांनी केली आहे. 

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या सोहळ्याचा वापर केला. त्यामुळेच वीस पेक्षा अधिक श्री सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. या सरकारमधील एकही मंत्री मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी केला नाही. या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली. 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे, मात्र खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी भर दुपारी खुल्या मैदानात राज्य सरकारने सोहळा आयोजित केला गेला. या सोहळ्याला उपस्थित तीनशेपेक्षा अधिक श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन वीसपेक्षा अधिक श्री सदस्यांचा नाहक बळी गेला. हवामान खात्याने तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असतानाही भर दुपारी सोहळा आयोजित करून राज्य सरकारने श्री सदस्यांचे प्राण घेतले आहेत. कोटयावधी रुपये खर्च पुरस्कार वितरणासाठी करण्यात आला, तर मग मंडप का उभारला नाही? मोठ्या प्रमाणात श्री सदस्यांचे मृत्यू होणे ही गंभीर बाब असून घटनेस कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  दलवाई यांनी केली.

वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याचे कामाची गती आता मंदावली आहे. निधी संपला असून गाळ पूर्णतः काढण्यात यश आलेले नाही. तर जगबुडी खाडीतील गाळ तसेच कोयनानगर धरणातील गाळ काढण्याची मागणी दलवाई यांनी केली. चिपळूण कराड रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घ्यावी. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. परशुराम घाटातील खोद कामामुळे भविष्यात मंदिराला धोका असल्याचे अभियंत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत मार्ग काढावा अशी सूचना केली. तर आंबा बागायतदारांना झाडामागे नुकसान भरपाई देत काजूला १६० रुपये हमीभाव देण्याची मागणी दलवाई यांनी केली. यावेळी महिला प्रदेशच्या सरचिटणीस रूपाली सावंत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हरिष शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, भरत लब्धे , सुरेश पाथरे उपस्थित होते.

  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcongressकाँग्रेस