शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील सागरी महामार्गाबाबत नितीन गडकरी उत्साही नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 13:16 IST

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला अपेक्षेपेक्षा खूपच वेळ लागला

रत्नागिरी : नवी आव्हानात्मक कामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील सागरी महामार्गाबाबत मात्र फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. आधी सध्याचे (मुंबई- गोवा महामार्गाचे) काम होऊद्या, मग बघू, असे मोघम उत्तरच त्यांनी दिले.गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मंत्री गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. सागरी महामार्ग आणि राजकीय विषयांबाबत मात्र त्यांनी फारसे स्वारस्य दाखवले नाही. याआधी मुंबई- गोवा महामार्गावरील पुलांच्या कामांचा प्रारंभ करण्यासाठी ते रत्नागिरीत आले होते, तेव्हा सागरी महामार्गही केंद्र सरकार करेल, असे म्हटले होते. मात्र, यावेळी त्यांनी या महामार्गाबाबत फारशी उत्सुकता दाखवली नाही. राज्य सरकार आता हा महामार्ग करत आहे. सध्याचे काम संपल्यावर त्याकडे बघू, एवढेच त्यांनी सांगितले.मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला अपेक्षेपेक्षा खूपच वेळ लागला आहे. कामे वेळेत पूर्ण करण्याची ख्याती असलेल्या गडकरी यांनी या कामाला झालेल्या विलंबाबाबत दु:खही व्यक्त केले. भूसंपादनात येणाऱ्या अडचणी, न्यायालयीन दावे यामुळे या कामाला विलंब झाला. कदाचित हीच बाब सागरी महामार्गाच्या उर्वरित कामाबाबतही होऊ शकते, अशा शक्यतेने त्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले नसावे, अशी चर्चा सध्या अधिकारी वर्गामध्ये सुरू आहे.सद्य:स्थितीत रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवली आहे. हा एकूण मार्ग ४९८ किलोमीटरचा असून, त्यासाठी अजून सुमारे ९,५०० कोटी खर्च अपेक्षित आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या महामार्गाचा उल्लेख असला तरी आर्थिक तरतुदीचा उल्लेख मात्र करण्यात आला नव्हता.

थोडे चौपदरीकरण

सागरी महामार्गावर १६५ कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर आहे. त्यात रत्नागिरी ते पावस या २० कि.मी. रस्त्याचा, रायगडमधील ८०, तर सिंधुदुर्गातील ६५ कि.मी. रस्त्याचा यात समावेश आहे.

अनेक पूल बाकीसागरी महामार्गाचे बरेचसे काम पूर्ण झाले. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी खाड्या असल्याने तेथील पुलांचे काम मात्र रखडलेलेच आहे. त्यामुळे हा महामार्ग आतापर्यंत पूर्ण होऊ शकला नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गNitin Gadkariनितीन गडकरी