देवरुख : देवरुखनजीकच्या कोसुंब येथे डॉक्टर्स, आशासेविका, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका तसेच सरपंच अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
ऑलिविया कंपनीच्यावतीने हा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला होता. कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर सुशील जाधव हे कोसुंब गावचे रहिवासी आहेत. यामुळे जाधव यांनी संगमेश्वर तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा विशेष सन्मान करण्याचे ठरवले व ऑलिवियाची उत्पादने देऊन सन्मान केला. यावेळी कंपनीचे सुहास पाटील, प्रकाश तांबोळकर हे अधिकारी उपस्थित होते. कोसुंबच्या सरपंच पूजा बोथरे, गावातील डाॅक्टर्स, आरोग्यसेविका, आशा वर्कर, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र, संगमेश्वर व देवरुख पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, महसूल विभाग व पत्रकारांनाही भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रकाश पाटील, दत्तकुमार जाधव, बंड्या गुरव, विकास साळवी, नरेंद्र जाधव, राजेंद्र जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
270821\463420210827_163653.jpg
कोरोना योद्ध्यांचे सत्कार