शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2018 रत्नागिरी : पालखीविना आडिवरे येथे रंगतो शिमगोत्सव, २ मार्चला होळी उभी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 12:58 IST

राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. रविवारी रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी रुंढे येथील होळी निश्चित करण्यात आली असून, २ मार्चला होळी उभी होणार आहे.

ठळक मुद्देपालखीविना आडिवरे येथे रंगतो शिमगोत्सव, २ मार्चला होळी पाच दिवस पोफळी नाचविण्याचा खेळ

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. रविवारी रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी रुंढे येथील होळी निश्चित करण्यात आली असून, २ मार्चला होळी उभी होणार आहे.शिमगोत्सव फाल्गुन शुद्ध दशमीला सुरु होतो आणि धुलिवंदनाला संपतो. या खेळाच्या सुरुवातीला म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमीला रात्री गावातील व्यवस्थापक व अन्य ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात. यावेळी देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. हे कौल लावण्याचे काम मंदिरातील देवीची पूजा करणारे गुरव करतात.

देवीचा कौल मिळाल्यावर खऱ्या अर्थाने या खेळाला सुरुवात होते. रविवारी रात्री कौल लागल्यानंतर देवतांवर गुलाल टाकून शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या छोट्या मंदिरासमोर जाऊन त्या देवतेला हाक मारण्याची प्रथा आहे. या मंदिराला ह्यचव्हाटाह्ण म्हटले जाते.रात्री पोफळ खेळवण्यास सुरुवात होते. पाचव्या रात्री म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या पहाटेला होम केला जातो. सहाव्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनला होळीचा सण साजरा करतात.होळीसाठी १२ वाड्यांपैकी एक वाडीचे ठिकाण निश्चित केले जाते. १२ वाड्यांतील सर्व ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात. तेथून ढोल-ताशांच्या गजरात व देवीचा अब्दागिर घेऊन स्वारी निघते व निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचते. तेथे गेल्यावर होळीसाठी पोफळ निवडली जाते. मग शेट्ये त्याची पाहणी करुन त्यावर गुलाल टाकतात व ती निश्चित करतात.त्यानंतर तिची पूजा करुन कुणबी समाजातील लोक ती खोदण्यास सुरुवात करतात. पोफळ बाहेर काढल्यावर त्याचा मुदा तासण्याचे काम सुतार समाज करतो. नंतर ही होळी ढोल-ताशांच्या तालावर नाचत ती वाडापेठ येथील महापुरुषाच्या ठिकाणी आणली जाते व तेथून नाचवत मंदिरात आणली जाते.

तेथून ती उभी करावयाची असते, त्याठिकाणी आणली जाते. यावेळी होळीवर देवीचे निशाण लावले जाते. हे निशाण आणण्याचे, सजवण्याचे काम परिट समाज करतो. या उत्सवात सर्व बांधवही सहभागी होतात.पाच दिवस पोफळी नाचविण्याचा खेळकोकणात शिमगोत्सव साजरा करण्याच्या निरनिराळ््या प्रथा अंमलात आहेत. अनेक देवदेवतांच्या पालख्या याकाळात दर्शनासाठी बाहेर पडतात. मात्र, याला अपवाद आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची पालखी आहे. शिमगोत्सवात देवीची पालखी बाहेर पडत नाही तर याठिकाणी पाच दिवस पोफळी नाचविण्याचा खेळ होतो.सगळे खेळे एकत्रआडिवरे गावातील विविध खेळे १ मार्च रोजी मंदिरात एकत्र येणार आहेत. यावर्षी ड्रॉ पद्धतीने रुंढे, कोंडसर बु., नवेदर, कालिकावाडी, कोंडसर बु. वरचीवाडी, थारळवाडी, भिकारवाडी, राजवाडी, टेंबाचीवाडी, वाडीखुर्द, भराडे, मोगरे, गाऊडवाडी येथील खेळे मंदिरात नृत्य सादर करणार आहेत.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Ratnagiriरत्नागिरी