शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गोविंदगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा, ८० हून अधिक तोफगोळे सापडले

By संदीप बांद्रे | Updated: July 2, 2024 12:18 IST

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांना ८० हून अधिक तोफगोळे सापडले. या तरुणांनी हा ...

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांना ८० हून अधिक तोफगोळे सापडले. या तरुणांनी हा ऐतिहासिक ठेवा गड किल्ले संरक्षण करणाऱ्या राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या ताब्यात दिले आहे. गोवळकोट येथील तरुण शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे हे गडावरती फेरफटका मारत असताना त्यांना सुरवातीला तोफेचे २ गोळे दिसून आले. तेथील माती बाजुला केली असता त्यांना अजूनही काही तोफांचे गोळे आढळून आले. त्यांनी लगेचच राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोटचे अध्यक्ष विशाल राऊत यांना संपर्क केला असता ते लगेचच गडावर आले आणि त्यांनी उपस्थित मुलांना योग्य त्या सूचना देऊन एक एक गोळा बाहेर काढण्याचे काम सुरू केले. बघता बघता मुलांना सुमारे ८० पेक्षा जास्त तोफगोळे बाहेर काढण्यात यश आले. सदरचे गोळे हे दगडी तोफगोळे आहेत.शहरातील गोवळकोट येथील राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १० वर्ष संवर्धनाचे काम चालू असताना या आधी चार ते पाच गोळे मिळाले होते गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा पहाता गडावर गोळे मिळतील. याचा अंदाज होताच पण गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.  यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत, शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे, सौरभ टाकळे, गणेश बुरटे, प्रथमेश शिंदे, सोहम हरवडे, आशुतोष राऊत उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण