शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरण : रत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरण, काम ६० टक्केच?, सिंधुदूर्ग आघाडीवररत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाची लांबी कशेडी ते खारेपाटणपर्यंत १७२ किलोमीटर आहे तर खारेपाटणपासून झारापपर्यंत महामार्गाची लांबी ही १२० किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मिळून २९२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम रत्नागिरीचा अपवादवगळता वेगात सुरू आहे.

दोन्ही जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तळेकांटे ते लांजा तालुक्यातील वाकेडपर्यंतचे सुमारे ७० किलोमीटरचे चौपदरीकरण रखडले असून, ते ८ ते १० टक्केच झाले आहे. त्यामुळे महामार्गाचे कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण पूर्ण होणार कधी व त्याचे उद्घाटन होणार कधी, असा सवाल केला जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला खऱ्या अर्थाने चालना दिली. २०१३ मध्ये कॉँगे्रस सरकारने या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार आले.

केंद्रात परिवहन, रस्ते विभागाचे मंत्रीपद नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले. गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या केवळ चौपदरीकरणालाच नव्हे तर कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण प्रकल्पाला चालना दिली. त्यानंतर ३६६ किलोमीटर चौपदरीकरणाचे कामही सुरू करण्यात आले.

हे काम लवकर होण्यासाठी गडकरी यांनी तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही घेतली. कामांचे टप्पे निश्चित झाले. काम प्रत्यक्षात २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, अनंत अडचणींचा सामना करीत हे काम सुरु आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झारापपर्यंत चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामाचा विचार करता सिंधुदुर्गमध्ये चौपदरीकरणाचे काम ६० ते ७० टक्केपर्र्यंत झाले आहे. सिंधुदुर्गमधील चौपदरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरून वाहतूकही केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हेच प्रमाण ३० टक्केपर्यंत आहे. आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमधील रखडलेले चौपदरीकरण हे टक्केवारी कमी होण्याचे कारण ठरले आहे.अनेक ठिकाणी उड्डाणपूलचिपळूण शहर, पाली, लांजा या ठिकाणी चौपदरीकरण प्रकल्पामध्ये उड्डाण पुलांचा समावेश आहे. राजापूरमध्ये प्रार्थनास्थळाचा विषय महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे प्रार्थनास्थळापासून दूरच्या अंतरावरून चौपदरीकरण केले जात आहे. उड्डाणपुलांच्या ठिकाणी ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा घेण्यात आली आहे. चिपळूणमध्ये कापसाळपर्यंत उड्डाणपूल होणार आहे. मात्र, त्याची लांबी आणखी वाढविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी