शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 16:16 IST

न्यायालयाने रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले

चिपळूण : मुंबई-गोवा माहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेले असताना चिपळूण नजिकच्या परशुराम घाटाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर काल, सोमवारी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले.अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत ॲड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या गुरुवारपर्यंत परशुराम घाटाचे काम कसे व कधी पूर्ण करणार याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.त्यातच ॲड. पेचकर यांनी शनिवारी रात्री अकरा वाजता परशुराम घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचा व्हिडिओच न्यायालयात सादर केला. त्यामुळे न्यायमूर्ती ए. के. मेनन व एम. एस. कर्णिक यांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने मुंबई-गोवा महामार्गावरील घाटांचे काम करताना या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन आधीपासून तज्ज्ञ व्यक्तींचा अहवाल घेऊन उपायोजना का केल्या नाहीत, असा सवाल विचारला.परशुराम घाटात यापूर्वीही दरडी कोसळण्याचा प्रकार घडला आहे, मग तज्ज्ञांची मदत का घेतली नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, कोकण रेल्वेचे काम करताना दरडी कोसळू नयेत यासाठी ग्रॅन्यूईटी सिस्टिम वापरली गेली. मुंबई-गोवा महामार्गावरील घाटांमध्ये अशाप्रकारे दडरी थोपविण्यासाठी ग्रॅन्यूईटी सिस्टिम का वापरली गेली नाही, अशी विचारणाही न्यायालयाने केली.तातडीने परशुराम घाटातील दरडी कोसळण्याचे प्रकार थांबण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करणार, काम कशापध्दतीने व कधी पूर्ण करणार, याचा तातडीने गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे अहवाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व प्रशासनाला दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय