शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांची मदत निकषांच्या जाळ्यात ?, कुटुंबात एका व्यक्तीलाच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:49 IST

Fisherman, funds, Government, Ratnagiri शासनाकडून मच्छिमारांसाठी ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यातील निकषांमुळे अनेक मच्छीमार या पॅकेजच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. एका कुटुंबातील तीन जण मच्छिमारीशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करीत असतील, तरीही त्यांच्यापैकी एकालाच त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी आर्थिक मदत मिळण्यास हा निकष अडचणीचा ठरणार आहे.

ठळक मुद्देमच्छीमारांची मदत निकषांच्या जाळ्यात ?कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच मिळणार मदत

रहिम दलालरत्नागिरी : शासनाकडून मच्छिमारांसाठी ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यातील निकषांमुळे अनेक मच्छीमार या पॅकेजच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. एका कुटुंबातील तीन जण मच्छिमारीशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करीत असतील, तरीही त्यांच्यापैकी एकालाच त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी आर्थिक मदत मिळण्यास हा निकष अडचणीचा ठरणार आहे.चक्री वादळामुळे गतवर्षी मासेमारी पूर्णत: ठप्प झाली होती. त्यातून सावरण्यासाठी राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून मत्स्य विभागाने प्रस्तावही मागविले होते. तशा सूचना मच्छीमार सोसायट्यांना दिल्या होत्या. मासेमारी नौका, मासे विक्रेत्या महिला यांना याचे लाभ दिले जाणार आहेत. या पॅकेजमधून रत्नागिरी जिल्ह्याला ४ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत.या पॅकेजमधून आर्थिक मदत देताना शासनाकडून आलेल्या परिपत्रकातील निकष मच्छिमारांना त्रासदायक ठरणारे आहेत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तिला त्याचा लाभ दिला जाणार असल्याचा निकष अनेक मच्छिमारांना अडचणीचा ठरणार आहे. काही कुटुंबांमध्ये एक मासेमारी नौका आहे, तर घरातील अन्य सदस्य मासेविक्रीचा व्यवसाय करतात. यामध्ये त्या दोघांपैकी एकालाच लाभ दिला जाणार असल्याचे निकषात म्हटले आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी शासनाने जाहीर केलेले पॅकेज हे केवळ दिखावा ठरु शकते, असे अनेक मच्छिमारांचे म्हणणे आहे.रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ४ कोटी ५० लाख रुपयांपैकी २८ लाख रुपये मच्छिमारांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आले आहेत. जसे प्रस्ताव येतील, तसे उर्वरित रकमेचे वितरण करण्यात येणार आहे.महिला वंचितशासनाच्या या पॅकेजमधून आर्थिक मदत देताना शासनाकडून आलेल्या परिपत्रकातील निकष मच्छिमारांना त्रासदायक ठरणारे आहेत. अनेक मच्छीमार महिलांकडे ग्रामपंचायतींचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या लाभापासून वंचित राहणार आहेत. 

टॅग्स :fishermanमच्छीमारfundsनिधीGovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी