शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रत्नागिरीत मुसळधार पाऊस,  आकाश फुटल्यासारखा गडगडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:22 IST

rain, ratnagirinews गेले तीन दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी शहर परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून गडगडाटासह विजांच्या लखलखाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा मधून मधून खंडित होत आहे. काही भागात वीज पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरीत मुसळधार पाऊस, आकाश फुटल्यासारखा गडगडाट वीज पडून महिला ठार, २ जखमी

रत्नागिरी : गेले तीन दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी शहर परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून गडगडाटासह विजांच्या लखलखाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा मधून मधून खंडित होत आहे. काही भागात वीज पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अतिकमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने त्याचा परिणाम म्हणून आणखी काही दिवस मुंबई, ठाणेसह दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालाय. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही काळ मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यानंतर पाऊस थांबला तरी गडगडाट सुरूच आहे.या वादळी पावसामुळे रत्नागिरी शहरात तसेच परिसरात काही ठिकाणी वीज कोसळण्याचे प्रकार घडले.भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. सर्व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे

वीज पडून महिला ठार, २ जखमी

देवरूख : मंगळवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात तुळसणी येथे विजेच्या धक्क्याने एक महिला मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तसेच मेघी सोलकरवाडी येथे वीज पडल्याने हसम कुटुंबातील दोनजण बेशुध्द पडले होते. या जखमींवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तालुक्यात मंगळवारी दुपारीच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तुळसणी येथे वीज पडली. येथील रियाना दिलावर मुकादम (४५) या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. याचवेळी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने मुकादम या बेशुध्द पडल्या. त्यांना तत्काळ देवरुखात प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सुत्रांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

तालुक्यातील मेघी सोलकरवाडी येथेही वीज कोसळली. ही वीज सागाच्या झाडावर पडल्याने झाड चिरले गेले आहे. या झाडाजवळ घर असलेल्या हसम कुटुंबियांना याचा धक्का बसला. कुटुंबातील संदीप जयराम हसम व पूजा दीपक हसम हे बेशुध्द पडले. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. संदीप आणि पूजा हसम यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुत्रांनी दिली. हसम घरातील पाच लहान मुलांनाही किरकोळ धक्का बसला.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी