शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 08:06 IST

गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत

चिपळूण : शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे चिपळूण जलमय झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालय परिसरात तीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने चक्क महामार्गाला नदीचे रूप आले हाेते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वाशिष्ठी नदीतून उपसा केलेला गाळ शहरातील जुना कालभैरव मंदिर परिसरात टाकल्याने येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत. शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे शहरवासीयांना फटका बसला. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालय परिसरात चक्क तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. याठिकाणी अरुंद मोऱ्या टाकल्याने ओझरवाडी येथील डोंगराचे वाहून येणारे पाणी अडते. त्यामुळे याठिकाणी रुंद मोऱ्या उभारण्याची मागणी केली जात होती. तसेच चौपदरीकरणांतर्गत दोन्ही बाजूंनी गटारे उभारली असली तरी परिसरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्याचा फटका दरवर्षी बसत असल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषदेला वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसामुळे जुना काल भैरव मंदिर परिसरात टाकलेल्या भरावामुळे मंदिर ते जिप्सी कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे हाही मार्ग बंद पडला आहे. तसेच सावर्डे - कापसाळ रस्त्यावर पाणी भरले आहे. 

काही तालुक्यांत रिपरिपरत्नागिरी : रविवारी दडी मारलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पडण्यास सुरुवात केली तर काही तालुक्यांमध्ये रिपरिप सुरू हाेती. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हरखले असून खोळंबलेल्या शेतीच्या कामांना आता गती येणार आहे. दरम्यान, गेल्या २४ तासातील पावसाची सरासरी नोंद २० मिलीलीटर झाली असली तरी दुपारी पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी पावसाचा जोर काहीसा वाढला होता. सकाळपासून जोरदार सरी कोसळू लागल्याने पाऊस नियमित होईल, असे वाटत होते; मात्र रविवारी पुन्हा पावसाने दडी मारली. दिवसभरात सरी कोसळत होत्या.

परशुराम घाटात यंत्रणा तैनातमुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी छोटे-मोठे दगड रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा घाटात तैनात करण्यात आली आहे. घाटातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने भीती व्यक्त होत आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढजिल्ह्यात काेसळलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी, खेड तालुक्यातील जगबुडी आणि लांजा तालुक्यातील काजळी नदीचे पाणी वाढले आहे. या नद्या इशारा पातळीवरुन वाहत आहेत.

 

टॅग्स :ChiplunचिपळुणRainपाऊस