शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 16:58 IST

या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर काही ठिकाणी उभारण्यात आलेले लग्न मंडप कोसळले. गोवळकोट भागातील शेतीत पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास देखील या पावसाने हिरावला. 

चिपळूण - दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्याचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यातच चिपळुणात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक वरुण राजाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. नागरिकांनी भिजतच काही ठिकाणी आडोशाचा आधार घेतला. या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर काही ठिकाणी उभारण्यात आलेल्या लग्न मंडपाची दाणादण उडाली.  गोवळकोट भागातील शेतीत पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास देखील या पावसाने हिरावला. 

या पावसाचा शेतीच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या खरिपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आली असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. हा पाऊस तसा नुकसानकारक असला तरी रब्बी पिकांसाठी मात्र महत्त्वाचा ठरणार आहे.  

ऐन थंडीच्या या महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दोन्ही ऋतुचा अनुभव मिळत आहे. सकाळच्या सुमारास थंडगार वातावरण तर दुपारच्या सुमारास गरमी. यातच सायंकाळच्या सुमारास या पावसाच्या सरी. यावातावरणामुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 

१४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटसह तुरळक ठिकाणी पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :ChiplunचिपळुणRainपाऊसRatnagiriरत्नागिरी