शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

भारताच्या निसटत्या विजयाच्या आनंदोत्सवातच त्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 16:01 IST

भारत ़अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला निसटता विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आंबव पोंक्षे येथील गणपत जानू घडशी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

ठळक मुद्देभारताच्या निसटत्या विजयाच्या आनंदोत्सवातच त्यांनी मृत्यूला कवटाळलेअरे आपण जिंकलो, भारताचा विजय झाला, असे ओरडत शेवटचा श्वास सोडला

देवरूख : भारत-अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला निसटता विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आंबव पोंक्षे येथील गणपत जानू घडशी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.आंबव (पोंक्षे )गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट सामन्याचे शौकिन होते.मुंबईला शासकीय सेवानिवृत्त झाल्यानंतर ते गावीच रहात होते. सेवेत असल्यापासूनच क्रिकेट हा त्यांचा आवडीचा विषय होता.शनिवारी रात्री ११ वाजता भारत-अफगाणिस्तान सामना रंगला असताना आपण पराभूत होणार या निराशेने ते प्रचंड नाराज होते.

शेवटच्या षटकात आपल्या चेंडूवर चार धावा दिल्याने त्यांनी त्याला प्रचंड शिव्यांचा भडीमार केला. पण लगेचच पुढे तीन विकेट घेत विजय मिळवल्याने ते आराम खुचीर्तून दोन हात वर करत ताडकन उठले.अरे आपण जिंकलो, भारताचा विजय झाला, असे  मोठ्याने ओरडले आणि धाडकन जमिनीवर कोसळणार तेवढ्यात मुलगा मंगेशने त्यांना सावरले. पण त्यांनी शेवटचा श्वास सोडला.

झाल्या प्रकाराने सारेच कुटुंब गोंघळून गेले, त्यांना तातडीने माखजन आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं होते. रविवारी दुपारी आंबव घडशीवाडी येथील स्मशानात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूRatnagiriरत्नागिरी