शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिव्यांगाच्या जीवनात फुलला आनंद; समिता अन् विजय अडकले विवाहबंधनात

By मेहरून नाकाडे | Updated: June 2, 2023 15:35 IST

दोघेही दिव्यांग मात्र चिकाटीने सुरु आहे स्वबळावर वाटचाल

रत्नागिरी : दाेन्ही पायांनी अधू मात्र इच्छाशक्ती प्रचंड, जिद्द, श्रम, चिकाटीने समिता कुळ्ये हिने (सोलगाव) दुकान व ब्युटीपार्लर सुरू केले आहे. विशेष म्हणजे समिताची वाटचाल स्वबळावर सुरू आहे. विजय बाईत (शीळ) सुध्दा एका पायाने दिव्यांग मात्र तरीही मुंबईत खासगी नोकरी करून कुटूंबाचा आधार ठरला आहे. मात्र दोघांची मने जुळली व विवाह बंधनात बांधले गेले. त्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी समाजातील विविध स्तरातील मंडळी उपस्थित होती.रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना खऱ्या अर्थाने योग्य दिशेकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देते. तसेच त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्नशील असते. दिव्यांगांचे अनेक प्रश्न सोडवताना दिव्यांगांचे लग्न म्हणजे दुर्मिळ गोष्ट निदर्शनास आली. प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष एस के नाकाडे हे डॉ. सुनीता पवार नाकाडे यांच्याशी विवाहबध्द झाले. या प्रेरणेतून अनेक दिव्यांगांनाही लग्नाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते याची जाणीव झाली. काही वर्षातच अनेक विवाह जुळून झाले. अशाच प्रकारे संस्थेची सभासद सोलगाव येथील समिता कुळये हिच्यासाठी लग्न ही संकल्पनाच मैलो दूर होती. समिता जन्मताच एका पायाने दिव्यांग नंतर दुसऱ्या पायाचीही समस्या निर्माण झाली. समिता स्वतःच्या वेदनेत व असंख्य अडचणीत वेढलेली असताना जिद्दीने विविध संकटांना सामोरे जातानाच संस्थेशी जोडली गेली. त्यानंतर तिच्या जीवनात, विचारात अमूलाग्र बदल झाला. प्रत्येक दिव्यांगाला संस्थेच्या कुटुंबात सामील करून त्यांचेही जीवन तिने समृध्द केले. समिता सध्या रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनच्या राजापूर समन्वय समितीची अध्यक्षा आहे. तिचे काम पाहता तिच्याशी लग्नाचा निर्णय विजय बाईत यांनी घेतला. विचार जुळले, मने जुळली आणि दि.१ जून रोजी लग्नसोहळा नातेवाईक, ग्रामस्थ मित्रमंडळींच्या उपस्थित उन्हाळे येथे पार पडला. नवदांमप्त्यांच्या आनंदात नातेवाईक, मित्रमंडळी, संस्था सदस्य सहभागी झाले होते.यावेळी सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा समितीचे शिलभद्र जाधव, श्रध्दा कळंबटे, प्रसाद फाटक, नारिशक्तीचे अशोक भुस्कुटे, आरएचपी फाउंडेशन संस्थेचे एस के नाकाडे , समीर नाकाडे, प्रिया बेर्डे, मानसी सावंत, संजीवनी शिंदे, लता चौगुले, फारुख मुल्ला, अक्षय चव्हाण, योगेश दहिवलकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी