शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत खुल्या गटात हनुमंत चोपडे विजेते

By मेहरून नाकाडे | Updated: October 29, 2023 18:40 IST

जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी : भाट्ये ते गावखडी व परत भाट्ये हे ४५ किमीचे अंतर अवघ्या १ तास २२ मिनिटांत पार करून पुरुषांच्या खुल्या गटात पुण्याच्या सिंहगड फाउंडेशनच्या हनुमंत चोपडे याने रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे विजेतेपद पटकावले.रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे कोस्टर सायक्लोथाॅन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी स्जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोमेंडीच्या शासकीय रोपवाटिकेचे प्रमुख राजेंद्र कुंभारे आणि रेस अक्रोस अमेरिका स्पर्धेचे विजेते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर डॉ. महेंद्र महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

खुल्या गटात साठ स्पर्धक सहभागी झाले होते. भाट्याचा पहिला चढाव पार करून पुढे सपाट रस्ता, गोळपला उतार, पावस बायपास रोडची वळणे, चढ, नंतर तीव्र उतार, पुन्हा वळणावळणांचा चढणीचा रस्ता, गावखडीचा तीव्र उतार अशा रस्त्यावरून स्पर्धकांनी सुसाट वेगाने सायकल चालविली. विजेत्यांनी गावखडीला फक्त ४५ मिनिटांत पोहोचून अवघ्या १ तास २२ मिनिटांत पुन्हा भाट्यात पोहोचले. पहिले दहा क्रमांक थोडक्या फरकाने विजेते झाले. जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

पुरुष खुला गट स्पर्धेत (एलाईट)- हनुमंत चोपडे (पुणे), सिद्धेश पाटील (पुणे), हर्ष पवार (पनवेल), विठ्ठल भोसले (पुणे), अश्विन मर्ढेकर (कऱ्हाड), रिहान शेख (परभणी), प्रथमेश दरेकर (पुणे ), हेमंत लोहार (पुणे), आर्यन मालगे (पुणे) आणि ॲशविन फर्नांडिस (गोवा).

४० वर्षावरील गटात अनुप पवार, राजेश रवी (पुणे), सतीश सावंत (पुणे), आशिष जोशी (पुणे), विष्णू तोडकर (कारवार), पंकज मारलेशा (मुंबई), प्रवीण पाटील (मुंबई).

महिला गटात सुजाता वाघेरे (नाशिक), प्राजक्ता सूर्यवंशी (विटा, सांगली), योगेश्वरी कदम (सांगली), अश्विनी देवरे (नाशिक), केनिश डिमेलो (पालघर), शमिका खानविलकर (रत्नागिरी), भावना द्विवेदी (पुणे) तर ५५ वर्षांवरील गटात मेरियन डिसुझा (मुंबई), डॉ. आदित्य पोंक्षे (पुणे), सुधाकर पाटणकर (मुंबई) विजेते ठरले. नॉनगिअर सायकलवरून दोन तासांच्या आत स्पर्धा पूर्ण करणारे ८० वर्षीय सायकलपट्टू भीमराव सूर्यवंशी आणि दहा वर्षांची सायकलपट्टू सान्वी पाटील (सव्वादोन तास) यांनाही गौरविण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी