शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे पेपरवाटप चक्क दुचाकीवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:37 IST

दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे.

ठळक मुद्देबारावीचे पेपरवाटप चक्क दुचाकीवरूनपरीक्षेच्या पेपरची चक्क दुचाकीवरून ने - आण

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे.राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या परीक्षेसाठी देण्यात येणारे पेपर विद्यार्थ्यांच्या हाती लागू नयेत, कोणत्याही विषयाचा पेपर फुटू नये यासाठी विशेष गोपनीयता पाळली जाते. त्यादृष्टीने पोलिसांसह विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात येते.रत्नागिरी तालुक्यात परीक्षेसाठी असणाऱ्या केंद्रांवर मात्र हे पेपर शिक्षकांमार्फत दुचाकीवरून नेण्यात येत आहेत. शहरातील एका शाळेतून हे गठ्ठे शिक्षकांच्या ताब्यात देण्यात येतात. त्यानंतर हे गठ्ठे एका पोलिसाच्या मदतीने शिक्षकांच्या दुचाकीवरून परीक्षा केंद्रापर्यंत नेण्यात येत आहेत.

परीक्षा संपल्यानंतर मुलांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पुन्हा दुचाकीवरून त्या शाळेपर्यंत आणण्यात येत आहेत. तालुक्यात गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, पटवर्धन हायस्कूल, नवनिर्माण हायस्कूल, एम्. एस्. नाईक हायस्कूल, पाली, गावडेआंबेरे अशी परीक्षा केंद्र आहेत.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी