शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी :उदय सामंत यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:49 IST

पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या सरकारी मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी आपण या विद्यापीठातून घेतलेली पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी आहे. आजतागायत आपण या पदवीचा फायदा घेऊन कोणत्याही प्रकारचा सरकारी लाभ अथवा नोकरी मिळवलेली नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी :उदय सामंत यांचा टोलापदवी बोगस असल्याचा डॉ. अभिषेक हरदास यांचा आरोप

चिपळूण : पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या सरकारी मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी आपण या विद्यापीठातून घेतलेली पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी आहे. आजतागायत आपण या पदवीचा फायदा घेऊन कोणत्याही प्रकारचा सरकारी लाभ अथवा नोकरी मिळवलेली नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारमध्ये तंत्रशिक्षण खात्याचे मंत्रीपद मिळवलेल्या सामंत यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचा डिप्लोमा केला असल्याचा त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मात्र, या विद्यापीठाला सरकारी मान्यता नसल्याचा आरोप करत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरदास यांनी सामंत यांची पदवी देखील बोगस असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सामंत यांनी सोमवारी चिपळूण दौऱ्यावर आले असताना या आरोपांचे खंडन केले.ते पुढे म्हणाले की, आपण बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी घेतली. आपल्या वैयक्तिक ज्ञानात भर पडावी यासाठीच ही पदवी घेतली. कोणताही शासकीय स्वरूपाचा फायदा या पदवीच्या माध्यमातून आपण घेतलेला नाही किंवा घेणारही नाही. मात्र, ज्या व्यक्तीने आपल्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला त्याचे तितकेच धन्यवाद मानावेसे वाटतात. कारण त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत आपले काम राज्यभरात पोहोचवण्यासाठी एकप्रकारे मदत केली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीministerमंत्री