शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रधनू’त पालकमंत्री उदय सामंत यांची तरूणाईत क्रेझ; थ्रीडी रांगोळीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले

By शोभना कांबळे | Updated: November 24, 2023 18:52 IST

रत्नागिरी : रत्नागिरी येथील दामले प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंद्रधनू’ या रांगोळी प्रदर्शनात राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय ...

रत्नागिरी : रत्नागिरी येथील दामले प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंद्रधनू’ या रांगोळी प्रदर्शनात राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची क्रेझ तरूणाईमध्ये असल्याचे दिसले. या प्रदर्शनात सामंत यांच्या रांगोळीने विशेषत: रांगोळीकार राहूल कळंबटे यांच्या टू इन वन थ्रीडी रांगोळीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.शहरातील दामले विद्यालयात दिवाळी सणाचे औचित्य साधून उदय सामंत फाउंडेशनतर्फे १४ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत इंद्रधनू हे रांगोळी प्रदर्शन रत्नागिरीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणि राज्यातील १९ दिग्गज रांगोळीकारांनी सहभाग घेतला होता.या कलाकारांनी अप्रतिम अशा रांगोळ्यांमधून रत्नागिरीतील मेवा, दैवते, परंपरा आदींचे चित्रण हुबेहूब केले होते.थाळीतील कोकणी खाद्यपदार्थ, दिवाळीच्या फराळाचे टेबलावर असलेले ताट, पिकलेले फणसाचे गरे, आंबे, करवंदे यांचे रांगोळीतून अप्रतिम दर्शन या कलाकारांनी घडविले. स्त्री सबलीकरण, साक्षरता आदींबाबत संदेश देतानाच स्त्री अत्याचार, कामगार दिन साजरे होत असले तरी त्यांच्या असलेल्या व्यथा आदी विविध सामाजिक समस्यांचे चित्रण विविध रांगोळीकारांनी केले होते. या रांगोळ्या पाहताना त्यातील ‘थ्रीडी इफेक्ट’मुळे त्या प्रत्यक्ष साकार झाल्यासारख्या वाटत होत्या.अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि त्यांचे केसरी वृत्तपत्र, रत्नागिरीकरांचे दैवत भैरीबुवा, पंढरपूरचा विठोबा, श्री रत्नागिरीचा राजा याचबरोबर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रत्नागिरीचे सुपुत्र असलेले आणि राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची हुबेहूब छबी या रांगोळीतून साकार झाली होती. दर्शक या कलाकृती पाहून स्तंभित होत होते. प्रदर्शनामध्ये आकर्षण म्हणून ( २ in 1) असलेली मंत्री सामंत यांची थ्री डी रांगोळीने सर्वांचेच विशेषत्र: युवांचे लक्ष आकर्षित केले. रांगोळीकार राहूल कळंबटे यांच्या हस्तकाैशल्यातून साकार झालेल्या या रांगोळीत एका बाजूने वाघाचे चित्र तर दुसऱ्या बाजूने उदय सामंत दिसत होते. तब्बल १३ तासांच्या परिश्रमाने कळंबटे यांनी ही कलाकृती साकार केली होती.दहा दिवस सुरू असलेल्या या रांगोळी प्रदर्शनात जिल्हाभरातूनच नव्हे तर बाहेरच्या सुमारे दहा हजार दर्शकांनी हजेरी लावली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत