शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाच्या समोरच गेला ‘दादा’चा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 18:57 IST

रत्नागिरी : दादाचा रमजानचा रोजा होता. प्रणय मला व दादाला घेऊन चालत भाट्ये समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेला. खेकडे पकडत ...

रत्नागिरी : दादाचा रमजानचा रोजा होता. प्रणय मला व दादाला घेऊन चालत भाट्ये समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेला. खेकडे पकडत असताना अंघोळीसाठी दोघे पाण्यात उतरले. मलाही पाण्यात येतो का विचारले. मात्र, मी भीती वाटते असे सांगून नकार दिला व किनाऱ्यावर बसून राहिलो. तेवढ्यात दोघे बुडू लागले.मी मदतीसाठी आरडाओरडा केला. लोक धावूनही आले. मात्र, दादाच्या पोटात पाणी व वाळू गेली होती. लोकांनी खूप धावाधाव केली, पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दादाचा जीव गेला... एवढे सांगताना धाकट्या अबुबक्कर सिद्दीक याला अश्रू अनावर झाले. आपल्या माेठ्या भावाचा मृत्यू डाेळ्यासमाेर पाहणाऱ्या अबुबक्करला अश्रू अनावर झाले हाेते.भाट्ये येथील समुद्रात अंघोळ करताना रेहान अब्दुल्ला शेख (११, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) आणि प्रणय रघुनाथ जाधव (२४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) या दाेघांचा बुडून मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासाेबत आठ वर्षांचा अबुबक्कर हाही हाेता. आपल्या माेठ्या भावाचा डाेळ्यांदेखत मृत्यू हाेताना पाहून त्याला धक्का बसला. भावाला वाचविण्यासाठी त्यानेही प्रयत्न केले.मूळ झाशी येथील शेख कुटुंब गेली २० ते २५ वर्षे  रत्नागिरीतील क्रांतीनगर येथे वास्तव्यास आहेत. अब्दुल्ला शेख हातगाडीवर भाजी विक्री, तर पत्नी निलोफर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करते. मिळणाऱ्या तुटपूंज्या कमाईवर त्यांचा घरसंसार चालतो. अब्दुल्ला व निलोफर यांना रेहान व अबुबक्कर सिद्दीक ही दोन मुले. मोठा रेहान इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवीत होता, तर अबुबक्कर सिद्दीक हा कोकणनगर येथील शाळेत दुसरीत आहे. रेहानने आईबरोबर स्वत:ही रोजा ठेवला होता.गल्लीत खेळत असताना या मुलांना अचानक प्रणय भेटला. दुपारी १:३० वाजता प्रणय रेहान व अबुबक्कर सिद्दीकला सोबत घेऊन गेला. कोकणनगरवरून हे तिघे चालत गेले. मात्र, दोन तासांत रेहान बुडाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली आणि आईला धक्का बसला. सोमवारी सकाळी रेहानचा मृतदेह क्रांतीनगर येथील घरी आणण्यात आला, त्यानंतर कोकणनगर येथील कब्रस्थानमध्ये पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. मोठ्या दादाच्या अशा जाण्याने सणासुदीला, ईदच्या आनंदाला जणू गालबोट लागले आहे.सायकलला रंग काढायचा हाेतापरीक्षा संपल्याने ही मुले घरीच होती. सायकलला रंग लावण्यासाठी मुले आईकडे पैशाचा आग्रह करीत होती. मात्र, वडील घरी आल्यावर पैसे देतो, असे सांगत आईने दोघांची समजूत घातली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणे