शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा संप; रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

By मेहरून नाकाडे | Updated: December 19, 2023 18:57 IST

रत्नागिरी : विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी जिल्ह्यातील ११८ ग्रामविकास अधिकारी व ४३९ ग्रामसेवक मिळून एकूण ५५७ ग्रामसेवक संपावर असल्याने ...

रत्नागिरी : विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी जिल्ह्यातील ११८ ग्रामविकास अधिकारी व ४३९ ग्रामसेवक मिळून एकूण ५५७ ग्रामसेवक संपावर असल्याने जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे कडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करणे. ग्रामसेवक पदाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे. शैक्षणिक अर्हतेसाठी कोणत्या शाखेची पदवी ग्राह्य धरणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १८५८ चे कलम ४९ चे नियमात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे. विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढविणे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दि.१ नोव्हेंब २००५ नंतर नियुक्ती दिलेले मात्र दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी भर्ती प्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवक यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे. कंत्राटी पध्दतीने ग्रामसेवक भरती बंद करणे. शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व मिळणे या मागणीसाठी ग्रामसेवक संपावर गेले आहेत. दि.२० डिसेंबर पर्यंत हा संप सुरू राहणार आहे.ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचा एक महिन्यापासून संप सुरू आहे. त्यातच आता ग्रामसेवकही संपावर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाजच ठप्प झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतStrikeसंप