शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुका- महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:24 IST

gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अजूनही बहुसंख्य ग्रामपंचायतींमधील उमेदवारांची यादी राजकीय पक्षांनी निश्चित केलेली नाही. तरीही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकांसाठी धुरळा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अजूनही बहुसंख्य ग्रामपंचायतींमधील उमेदवारांची यादी राजकीय पक्षांनी निश्चित केलेली नाही. तरीही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील एकूण ८४६ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून या काळात संपली आहे, तर ४७१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या काळात संपली आहे. त्यामुळे आता एकूण ४७९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. २३ ते ३० डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. जिथे गरज आहे तेथे १५ जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.राज्यात एकत्र असलेली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमध्येही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाला किती जागा, कोण उमेदवार हे निर्णय स्थानिक पातळीवरच घेतले जाणार आहेत. मात्र, आघाडीचा निर्णय अंतिम झाला आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचवेळी शक्य तेथे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्नही भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका खेड तालुक्यात होणार आहेत, तर सर्वात कमी निवडणुका मंडणगड तालुक्यात होणार आहेत. सरपंच पदाची आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत. राजकीय पक्षांनी अजून आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे आतापासून पक्षांतर्गत वादांनी जोर धरला आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम- दिनांक २३ ते ३० डिसेंबर : नामनिर्देशनपत्र दाखल करणे.- ३१ डिसेंबर : नामनिर्देशनपत्रांची छाननी- ४ जानेवारी : नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत- ४ जानेवारी : निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करणे- १५ जानेवारी : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० मतदान- १८ जानेवारी : मतमोजणी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी