शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण-कऱ्हाड मार्ग खासगीकरणातून, राज्य शासनाकडून शासकीय आदेशही जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:37 IST

राज्य शासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कऱ्हाड ते चिपळूण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. आता हा मार्ग खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून कऱ्हाड ते चिपळूण रेल्वेमार्गाच्या कामासाठी हात आखडतामार्ग उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीबरोबर करार

चिपळूण : बुलेट ट्रेनवर हजारो कोटी रुपचे खर्च करणाऱ्या राज्य शासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कऱ्हाड ते चिपळूण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. आता हा मार्ग खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांचा शोध घेणे सरकारकडून सुरु झाले आहे. मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही.

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला एकमेकांशी जोडणारा हा रेल्वेमार्ग खासगीकरणातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासकीय आदेशात तसा उल्लेखही करण्यात आला आहे.

कऱ्हाड - चिपळूण रेल्वेमार्ग हा केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणार होता. यासाठी रेल्वे व महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी ५० टक्के खर्च उचलण्याचा करारही गेल्यावर्षी केला होता.

सुमारे चार हजार कोटींच्या या मार्गासाठी सर्वेक्षणही झाले होते. केंद्र सरकार, राज्य सरकार व कोकण रेल्वे महामंडळातर्फे हा प्रकल्प उभारण्यासाठीची तयारीही सुरु होती.

यासाठी मार्ग उभारणीचे काम करणाऱ्या एका कंपनीबरोबर सरकारने करारही केला होता. मात्र, कंपनीने करारावर काम करणे शक्य नाही, असे सांगून माघार घेतली होती. त्यामुळे तो रद्द करण्यात आला.

यावर टीका झाल्यानंतर सरकारची भूमिका बदलली आहे. राज्य शासनाने आता हा मार्ग खासगीकरणातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे शासकीय आदेशही जारी करण्यात आले आहेत.

खासगीकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारताना कोकण रेल्वे महामंडळाचे २२ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे २२ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे हा मार्ग उभारण्यात शासनाला रस नसल्याचेच द्योतक आहे, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी म्हटले आहे. रेल्वेच्या माध्यमातून हा मार्ग झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndian Railwayभारतीय रेल्वे