शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोवळकोट रस्ता दुरुस्तीचे काम पाडले बंद, डांबराचा वापर कमी, नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:28 IST

अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.

ठळक मुद्देगोवळकोट रस्ता दुरुस्तीचे काम पाडले बंदडांबराचा वापर कमी, नागरिक आक्रमक

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथे सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हे काम बंद पाडले. कारपेट करताना खडीवर अल्प प्रमाणात डांबर वापरले जात होते.

याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.गोवळकोट रोड ते गोवळकोट असे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. सुरुवातीपासूनच हे काम वादग्रस्त ठरले आहे. बीबीएम करताना ठेकेदाराने डांबराचा पुरेसा वापर केला नाही म्हणून येथील नागरिकांनी हे काम बंद पाडले होते.

मुख्याधिकारी डॉ.विधाते यांनी रस्त्याची पाहणी करुन ठेकेदाराला समज दिली. नगर परिषदेने चांगल्या कामाची हमी दिल्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम पुन्हा सुरु झाले. मात्र कारपेट करताना अनेक ठिकाणी डांबराचा वापर कमी प्रमाणात झाल्याने नागरिक आक्रमक झाले.एका दिवसात अनेक ठिकाणची खडी वर आल्यामुळे नागरिक संतप्त झाले. मंगळवारी सकाळी गोवळकोट रोड येथील कमानीच्या परिसरात काम सुरु होते. आक्रमक नागरिकांनी ते बंद पाडून अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविले.

मुख्याधिकारी डॉ.विधाते, स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कारपेट केलेला रस्ता हाताने उखडून दाखविला. डांबरीकरण केल्याने खडी सहज वर येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ताकीद देण्याची हमी दिली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी