शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

शेळीपालन दिशादर्शक : दीपक कदम

By admin | Updated: March 28, 2015 00:08 IST

पर्याय खुले : स्वत:च्या प्रगतीबरोबरच एका तरूणाने उभारला मार्गदर्शक प्रकल्प

सुभाष कदम - चिपळूण  नोकरीसाठी लोकांच्या दारोदारी फिरायचे, त्यांचे चार शब्द ऐकून घ्यायचे एवढे करुनही अपेक्षित मोबदला पदरात पडत नाही. आपण लोकांकडे जाण्यापेक्षा लोक आपल्याकडे आले पाहिजेत, अशी खुणगाठ बांधून आपण शेळीपालन व्यवसायात गुंतल्याचे पेढांबे येथील शेतकरी दीपक रघुनाथ कदम यांनी सांगितले. दीपक कदम, त्यांच्या आई रजनी, पत्नी ज्योती व दोन लहान मुले यांच्यासह पेढांबे - मावळतवाडी येथे राहतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला जातो. दहावीनंतर पुढे काय? याबाबत विचार करत असतानाच गावातील एका ज्येष्ठ नागरिकाकडून शेळीपालनाबाबत माहिती मिळाली आणि आपण शेळीपालनाकडे वळलो. गेली १० वर्षे आपण शेळीपालन करीत असून, सध्या आपल्याकडे २० शेळ्या व १० बोकड आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय औषध व लसीकरणही केले जाते. वर्षाकाठी आपण ८ ते १० बोकड विकतो. एका बोकडाची किंमत २० ते २५ हजार रुपये असते. त्यामुळे वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. यामध्ये साधारणत: दीड लाखाचा नफा होतो. भविष्यात बंदिस्त शेळीपालन मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला विचार आहे. माझ्याकडे जमीन नाही. त्यामुळे गावातीलच दोन, तीन शेतकऱ्यांची एक एकर जमीन सध्या वापरण्यासाठी घेतली आहे. या जमिनीत नांगरणी करुन गवत पेरणार व तेथेच शेड बांधून शेळीपालन सुरु करणार आहे. आपण शेळीपालन प्रकल्प बघायला जातो. लोकांनी आपल्याकडे यायला हवे यासाठी आपला प्रयत्न आहे. हा व्यवसाय शास्त्रशुद्ध आधुनिक पद्धतीने केल्यास यामध्ये चांगला फायदा आहेकठोर मेहनत घेतल्यास हमखास उत्पन्नाची हमीशेळीपालन करतो म्हणून आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे. परंतु, आज ना उद्या तो १०० टक्के बदलेल, यावर आपला विश्वास आहे. एखाद्याकडे ५० बकऱ्या व २ नर असतील तर वर्षभरात त्याच्या अंगणात चारचाकी गाडी दिसेल. पण, त्यासाठी कठोर मेहनत घेऊन व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. हा व्यवसाय अतिशय फायद्याचा आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अशा व्यवसायात यायला हवे, असे आवाहन दीपक कदम यांनी केले. कदम यांचा जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे शिरोही शेळीपालन गटात प्रथम क्रमांक आल्याने जिल्हास्तरावर सत्कारही करण्यात आला आहे.