शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा मंदार लाड ठरला सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता; १११ खेळाडूंचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:48 IST

प्रथम विजेत्या मंदार लाड याला रोख रक्कम ११००० व चषक देऊन गौरविण्यात आले

मेहरून नाकाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: येथील के.जी.एन सरस्वती फाऊंडेशनतर्फे आयोजित भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे स्मृती सलग दहाव्या वर्षी खुल्या जलद बुध्दीबळ स्पर्धेत गोव्यातील मंदार लाड विजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण १११ खेळाडू सहभागी झाले होते.

प्रथम विजेत्या मंदार लाड याला रोख रक्कम ११००० व चषक देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या सोहम खसबरदारने द्वितीय तर रवींद्र निकम याने तृतीय क्रमांक मिळविला. दोघांना अनुक्रमे ९००० रूपये व ७५०० रूपयांची बक्षिसे देवून गौरवण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, केजीएन सरस्वती फाउंडेशन व कऱ्हाडे ब्राम्हण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी, ऋचा जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला. यापैकी ४० हून अधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय फीडे गुणांकन प्राप्त खेळाडू होते. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे यांच्यासोबत दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले यांनी काम पाहिले.

टॅग्स :Chessबुद्धीबळ