शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

प्रशासन आमच्याकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 23:55 IST

गुहागर पंचायत समिती सभा : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हतबलतेमुळे सदस्य आक्रमक

गुहागर : तालुक्यातील शिक्षकांचे समायोजन व बदली विषय याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी मासिक सभेत हतबलता दर्शवली. यावरुन शिक्षक संघटना शिक्षण विभाग चालवतात का? असा सवाल करत शिक्षक विभागाचे प्रमुख म्हणून तुमचे अधिकार वापरा, नाहीतर शिक्षण संघटनेच्या ताब्यात प्रशासन द्या, अशा शब्दात सदस्य सुरेश सावंत यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले.गुहागर पंचायत समितीने तत्कालीन उपसभापती राजेश बेंडल यांच्या कारकिर्दीत तालुक्यात सेमी इंग्लिश शाळा सुरु केल्या. यानंतर जिल्हास्तरावरुन शाळांची ही संख्या सर्वच ठिकाणी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात चार सेमी इंग्लिश शाळा होत्या. आता त्यांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. पाचवीपर्यंत वर्ग आल्याने या शाळांवर इंग्रजी माध्यमाचे शिक्षक असणे आवश्यक आहे. अन्यत्र शाळेत असे शिक्षक उपलब्ध आहेत. तालुका प्रशासनाला समायोजनाचा अधिकार मिळाल्यास हा प्रश्न सुटेल यासाठी वरिष्ठ पातळीवर मंजुरी मिळावी असा ठराव यावेळी करण्यात आला. तसेच नव्याने येणाऱ्या इंग्रजी माध्यम शिक्षकांना या शाळा द्याव्यात. अशावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरावेत, असे सुरेश सावंत व राजेश बेंडल यांनी सांगितले. यावर मात्र गटशिक्षणाधिकारी यांनी हतबलता दर्शवत कोणी तक्रार केल्यास सर्व प्रक्रिया थांबवावी लागेल, असे सांगितले. शिक्षक बदलीवर शिक्षक संघटना वरचढ ठरतात का? असा सवाल केला.ग्रामीण पाणी पुरवठ्यांतर्गत टँकरचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर यासाठीचा निधी असूनही उधारीवरती डिझेल व इतर खर्च का करावा लागतो? असे राजेश बेंंडल यांनी विचारले. आरे (ब्राह्मणवाडी) भागात बोअरवेलला मोठ्या प्रमाणात पाणी लागले ही बाब चांगली आहे. तरीही कुरतुडवाडी व इतर काही वाड्यांची मागणी असूनही ब्राह्मणवाडीतील अकरा घरांमध्येही विहिरी असूनही, येथे बोअरवेल का मारली गेली? असा सवाल सुरेश सावंत यांनी केला. एकात्मिक बालविकास अंतर्गत काही अंगणवाड्यांना गेली चार वर्षे रॉकेल, तांदूळ मिळालेला नाही. तो नियमीत मिळावा यासाठी ठरावाने पत्रव्यवहार करावा, असे सांगण्यात आले.ब्राह्मणवाडी येथे बोअरवेलला पाणी लागल्यानंतर आरोग्य विभागाने हे पाणी पिण्यायोग्य आहे का? याची पाणी नमुना चाचणी का केली नाही, असेही विचारण्यात आले. यावेळी सभापती विलास वाघे, सुनील जाधव, संपदा गडदे, गायत्री जाधव, पूनम पाष्टे, सूचना बागकर, पांडुरंग कापले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कारवाई का नाही : कर्मचाऱ्याला मारहाणआरोग्य विभागांतर्गत हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला डॉक्टरकडून मारहाण झाल्याबाबत कर्मचारी संघटनेतर्फे काळ्या फिती लावून कर्मचारी ड्युटीवर असताना कामावर कसे बाहेर पडले, या कर्मचाऱ्यावर अद्याप का कारवाई झाली नाही, असा जाब या सभेत विचारण्यात आला.अहवाल घ्यावाग्रामपंचायत विभागांतर्गत ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानादरम्यान सर्व ग्रामपंचायतींना निधी मिळाला आहे. सर्व दिवस हे अभियान राबविले का? याबाबत पाठपुरावा करुन अहवाल घ्यावा, असे यावेळी सदस्यांकडून सांगण्यात आले.कारवाई करणारआरोग्य विभागांतर्गत डॉक्टरकडून झालेल्या मारहाणीबाबत दोन दिवसात कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी बी. ई. साठे यांनी सांगितले.