शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात रत्नागिरीच्या कन्यांचा सहभाग

By शोभना कांबळे | Updated: February 1, 2024 17:06 IST

सर्व महिला वादकांच्या पारंपरिक वादनाने प्रजासत्ताक दिनाचे संचलन होण्याचा हा गेल्या ७५ वर्षांतील पहिलाच ऐतिहासिक प्रसंग

शोभना कांबळेरत्नागिरी : प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर आयोजित करण्यात आलेल्या ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात रत्नागिरी जिल्ह्यातील १९ आणि पुण्यातील १ अशा २० मुली आणि चार मुलांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यात चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, खेड तालुक्यांतील सहभागींचा समावेश होता.राष्ट्रगीतानंतर प्रजासत्ताक दिनाची परेड भारताच्या विविध राज्यांतील १२ पथकांतील सुमारे ११२ महिलांच्या पारंपारिक वाद्यवादनाने झाली. सर्व महिला वादकांच्या पारंपरिक वादनाने प्रजासत्ताक दिनाचे संचलन होण्याचा हा गेल्या ७५ वर्षांतील पहिलाच ऐतिहासिक प्रसंग होता. यात विघ्नहर्ता आणि जय हनुमान या ढोलपथकांचा समावेश होता. चिपळूणमधील साहील रानडे पथकप्रमुख, तर मुंबईच्या देवेंद्र शेलार या तरुणाने या पथकाचे नेतृत्व केले. यात विघ्नहर्ता ढोलपथकातील ७ मुली आणि ३ मुलगे होते; तर चिपळूणमधील जय हनुमान ढोलपथकामधील २ मुली होत्या. तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि खेड येथीलही मुली सहभागी झाल्या होत्या.

चिपळूणमधील पथकप्रमुख साहिल रानडे तसेच वेदांत विजय पवार, भावेश जयंत चिंगळे, धनश्री विवेक फिरमे, प्रणाली नारायण पंडव, प्रियांका पांडुरंग शिगवण, साक्षी दिनेश घाडगे, अंकिता संतोष डिंगणकर, ज्ञानेश्वरी जनार्दन हुमणे, सिद्धी सदानंद बोलाडे, साक्षी सूर्यकांत पवार, दीक्षा संदीप सुतार, पूनम संतोष घोरपडे, रोशनी सुनील घोरपडे, मृण्मयी मंदार ओक, सानिका मनोज लोटेकर यांचा समावेश होता. विघ्नहर्ता पथकातील धनश्री फिरमे ही आपदा सखी आहे. तसेच लांजातील आदित्य दिलीप कांबळे, अंकिता अविनाश जाधव, अनुष्का अविनाश जाधव, राजापुरातील आदिती सुनील कुर्ले, पूजा सुनील कुर्ले, रत्नागिरीतील नुपूर दत्ताराम कीर, खेडची प्रणोती बृहस्पती महाकाळ आणि पुण्याची गौरी नितीन जोशी यांचाही या पथकात समावेश होता.

संचलनाची सुरुवात महाराष्ट्राच्या पथकातील महिलांच्या शंखनाद आणि तुतारीसोबतच ढोल आणि ताशावादनाने झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ हे कर्तव्यपथावर उपस्थित होते. यानंतर तेलंगणा, कर्नाटक, आदी राज्यांतील महिला वादकांनी संचलन केले. हा प्रसंग डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.यानंतर देशभरातील सुमारे १५०० नामांकित महिला नर्तकींच्या नृत्याचा आविष्कार पाहायला मिळाला. एसएनएच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबईचे देवेंद्र शेलार आणि टीमच्या नृत्यदिग्दर्शनातून महाराष्ट्रातील महिलांचेही सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी होते.

कर्तव्यपथावर राष्ट्रगीत सुरू झाले. त्यानंतर संचलनाला सुरुवात झाली. लगेचच महाराष्ट्राच्या पथकाचे संचलन होते. हे संचलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्यासमोर झाले. आमच्याकरिता हा क्षण रोमांचक असा होता. - धनश्री फिरमे, आपदा सखी, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४delhiदिल्ली