रत्नागिरी : शहरानजीक मिऱ्या येथील समुद्रकिनारी आज, शनिवारी सकाळी महाकाय मासा मृतावस्थेत आढळला. ग्रामस्थांच्या मते हा मासा व्हेल प्रजातीचा असण्याची शक्यता आहे.मिऱ्या समुद्रकिनारी असणाऱ्या ग्रामस्थांना सकाळी महाकाय मासा दिसला. ग्रामस्थांनी पाहणी केली असता तो मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले. हा मासा सुमारे ३० ते ४० फूट लांब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.या माशाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असून, समुद्राच्या प्रवाहासोबत हा मासा वाहत मिऱ्या किनाऱ्यावर आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, या माशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकलेले नाही.
रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला महाकाय मासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 13:58 IST