शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 20:16 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

ठळक मुद्देरत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाटतत्कालिन मत्स्यमंत्री अनीस अहमद यांनी दिली ग्वाही पण..

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.साळवी यांनी यापूर्वीही हे महाविद्यालय अन्यत्र नेण्याचा विषय आला तेव्हा प्रखरपणे विरोध दर्शवला होता. तसेच सप्टेंबर २०१७च्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये आमदार राजन साळवी, आमदार संजय कदम, आमदार संजय केळकर यांनी मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत न करण्याबाबत ठराव करुन घेतला आहे.

असे असतानाही पुन्हा एकदा सरकारने मत्स्यविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट घातल्याचे समजताच साळवी यांनी कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याऐवजी सरकार कोकणातील मत्स्यविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट घालत असल्याबाबत संताप व्यक्त केला.ग्वाही दिली पण..यापूर्वी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना एकत्र करुन मोठे आंदोलन उभे केले. अखेर शासनाने नमते घेत कोकणातील मत्स्य महाविद्यालय हे कोकणातच राहील, ते अन्यत्र कोठेही नेण्यात येणार नाही, अशी ग्वाही तत्कालिन मत्स्यमंत्री अनीस अहमद यांनी दिली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणfishermanमच्छीमार