शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri- गांजा विक्री प्रकरण: बॉडीबिल्डर अमर लटके याला पुन्हा अटक

By संदीप बांद्रे | Updated: October 30, 2023 19:24 IST

चिपळूणात गांजा प्रकरणी पोलिसांची धरपकड सुरू

चिपळूण : चिपळूणात गांजा प्रकरणी पोलिसांची धरपकड सुरू आहे. आतापर्यंत चिपळूण पोलिसांनी सात जणांना अटक केली असून गांजा विक्रेता बॉडीबिल्डर अमर चंद्रकांत लटके याला पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चिपळूणात चार तरूण गांजा ओढताना विरेश्वर कलनी नजिक सापडले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. या तरूणांनी आपण गांजा अमर लटके यांच्याकडून आणल्याचे सांगितल्यानंतर जिम व्यावसायीक बॉडीबिल्डर अमर लटके याला अटक झाली. यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली व त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. मात्र याच दरम्यान धरपकड सुरू असताना विजय शांताराम राणे (५६, मुरादपूर भोईवाडी), ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव कुंभारवाडी) यांना गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमर लटके याच्याकडून आठ दिवसांपुर्वी गांजा खरेदी केल्याचे सांगितले. यानंतर जामिनावर सुटलेला अमर लटके याला पुन्हा सोमवारी सायंकाळी ४ वाजता ताब्यात घेऊन अटक केली आहे. याशिवाय रविवारी रात्री शहरात गस्त सुरू असताना अमीर उमर शेख (२३, मुरादपूर मिठागरी मोहल्ला) याला गांजाा सेवन प्रकरणी अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून प्रत्येकवेळी आपण गांजा अमर लटके याच्याकडून खरेदी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लटके गांजा कोठून आणतो, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याप्रकरणी पोलिसांनी गांज्याचे रॅकेट उद्धस्थ करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. चिपळूणात झालेल्या नागरिकांच्या बैठकीत देखील हाच मुद्दा उपस्थित झाला. गांजा ओढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतानाच पोलिसांनी गांजा पुरवठादार आणि त्यामागे असलेले रॅकेट उघड करून त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणPoliceपोलिस