शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, कोरोना रुग्णाला इंजेक्शन देऊन मारतात; गावकऱ्यांनी रुग्णवाहिका रोखली, पोलिसांवरही दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:57 IST

कोरोनाचा रूग्ण घेऊन येण्यासाठी साखरी नाटे येथे गेलेल्या रूग्णवाहिकेला तेथील जमावाने विरोध केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला.

ठळक मुद्देकोरोना रूग्ण नेऊ नये म्हणून गँगजमावाची पोलिसांवर दगडफेकसाखरीनाटे येथील प्रकार, परिचारिका, पोलीस जखमी

राजापूर : कोरोनाचा रूग्ण घेऊन येण्यासाठी साखरी नाटे येथे गेलेल्या रूग्णवाहिकेला तेथील जमावाने विरोध केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. हा प्रकार कळल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली आणि त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. साखरी नाटे येथील एका ३२ वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आणण्यासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका बुधवारी सकाळी साखरी नाटे येथे गेली. मात्र, तेथे अचानक जमाव जमला आणि जमावाने रूग्णाला नेण्यास मनाई केली. जमाव आणि त्यांचा विरोध पाहून रूग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पण, पोलिसांची गाडी आल्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला. या जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस आणि एक परिचारिका जखमी झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या भागातील एक रुग्ण उपचाारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. मात्र, उपचारासाठी नेण्यात आलेल्या रुग्णाचे निधन झाले. त्यानंतर, त्या रुग्णावर अंत्यसंस्कारही कोविड पॉझिटीव्हच्या नियमानुसार झाले. त्यामुळे या भागातील नागरिकांनी रुग्णालयातील उपचाराची भीती घेतली आहे. या भीतीमुळेच सदरील रुग्णालाही रुग्णालयात नेण्यास, स्थानिकांनी विरोध केला. विशेष म्हणजे रुग्णालयात नेऊन इंजेक्शन देऊन रुग्णाला मारतात, असा अपप्रचार आणि चर्चा या परिसरात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांकडून रुग्णाला नेण्यास विरोध करण्यात येत होता. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील सुज्ञ व अनुभवी लोकांशी चर्चा केली, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर, स्थानिकांनी रुग्णाला रुग्णालयात नेण्यास परवानगी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी