शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav : देवरूखच्या चौसोपीतील प्रसिध्द गणेशोत्सव, आठवी पिढी करीत आहे साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:20 IST

गणपतीबाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या येथील श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयूरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५० वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव दिनांक १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. जोशी कु टुंबियांची आठवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहे.

ठळक मुद्देदेवरूखच्या चौसोपीतील प्रसिध्द गणेशोत्सव साडेतीनशे वर्षे : आठव्या पिढीत नातेवाईकांच्या हातात उत्सवाची धुरा

देवरूख : गणपतीबाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या येथील श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयूरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५० वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव दिनांक  १७ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. जोशी कु टुंबियांची आठवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहे.जोशी यांच्या घराण्यातील सातव्या पिढीचे रघुनाथ उर्फ पंतभाऊ जोशी यांनी या उत्सवाला चार चाँद लावत उत्सवाला व्यापक स्वरूप आणून दिले. त्यांनी हा उत्सव वयाच्या १६ व्या वर्षीपासून वडीलधाऱ्यांबरोबर साजरा केला. त्यांना त्यांच्या जीवनप्रवासातील दु:खांच्या छायेतून गणरायानेही अनेकवेळा बाहेर काढले होते.त्यांच्या पश्चात आठव्या पिढीतील नातेवाईकांच्या हातात उत्सवाची धुरा आली आहे. यानुसार यावर्षीचा उत्सव १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. उत्सवासाठीची गणेशमूर्ती सात्वीक भावाने देवरूख येथील भोंदे कुटुंबिय घडवत असतात.  भोंदे यांच्या गणेश चित्रशाळेतून सकाळी येथील गणपतीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. मूर्ती आणल्यावर सकाळी श्रींची स्थापना, द्वारपूजन, नृत्य, मध्यांन्हपूजा, नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी भक्तगणांची सहस्त्रावर्तने झाली.  रात्री सायंपूजा, आरती, मंत्रपुष्प, उपाहार नैवेद्य, प्रसाद, रात्रौ उशिरा पुराण कीर्तन होणार आहे. याचप्रमाणे प्रतिदिन कार्यक्रम होणार आहेत.

गणेशाचा जन्मोत्सव हा चतुर्थीला साजरा केला जातो. पूजा, जन्मोत्सव, नवस करणे, नवस मानवणे, महाभिषेक, महापूजा, आरती, मंत्रपुष्प, प्रसाद, पुराण, कीर्तन तसेच महाप्रसाद, रात्री स्थानिकांचे करमणूक कार्यक्रम, पहाटे पुराण कीर्तन व नृत्य, प्रसाद होणार आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी