शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-गणपतीपुळे परिसर प्रथमच निस्तब्ध,श्रींच्या मंदिराला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 17:39 IST

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

ठळक मुद्देगणपतीपुळे परिसर प्रथमच निस्तब्ध,श्रींच्या मंदिराला कुलूपसमुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट, व्यापाऱ्यांची दुकाने बंदच

गणपतीपुळे : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

दररोज हजारो भाविक भेट देत असलेले गणपतीपुळे देवस्थान मंगळवारपासून बंद झाल्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात काही प्रमाणात आलेल्या भाविकांना मंदिरात श्री गणेशाचे दर्शन न मिळाल्यामुळे घोर निराशा झाल्याचे चित्र दिसून आले.कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गणपतीपुळे मंदिर जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील सर्वच व्यावसायिकांनी प्रतिसाद दर्शवित आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. तसेच समुद्र चौपाटीवरील ही वॉटरस्पोर्ट, मोटार बाईक, शहाळी विक्रेते, फोटोग्राफर व इतर सर्वच व्यावसायिकांनीही बंदमध्ये सहभागी होऊन कोरोनाविषयी विशेष खबरदारी घेतली आहे.त्याशिवाय गणपतीपुळे परिसरातील खासगी हॉटेल्स-लॉजिंग व्यावसायिकांना जयगड पोलीस स्थानक व गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाची सविस्तर माहिती घेऊनच खबरदारी घ्यावी, असे संबंधित व्यावसायिकांना सांगण्यात आले आहे.

मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गणपतीपुळे परिसरात कोरोनाबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.मोफत प्रसाद वाटपकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे मंदिर देवस्थान समितीकडून बंद ठेवण्यात आले असले तरी मंदिर परिसरातून दर्शन घेणाऱ्या भाविकांना मोफत लाडू प्रसादाचे वाटप देवस्थान समितीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दर्शनाची संधी बंद झाल्याने आलेल्या भाविकांना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच उभे राहून दर्शन घेतल्यानंतर बुंदी लाडूचा प्रसाद देण्यात येत आहे.सूचना फलकसंस्थान श्री देव व गणपतीपुळे पंच कमिटीकडून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या निर्णयाला भाविक, पर्यटक व ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे. यासाठी मंदिर परिसरात व मोरया चौकातील देवस्थानच्या स्वागत कमानीजवळ सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा हाहाकार लक्षात घेता आपण सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर