शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

मित्राच्या वडिलांनीच विशाखाला संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:08 IST

आपल्या मुलाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मित्राच्या वडिलांनीच विशाखा अजय महाडीक (१८, कसबा) हिचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मित्राचे वडिल सुनिल रामचंद्र गुरव (४७, चेंबूर, मुंबई, मूळ फणसवणे गुरववाडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

ठळक मुद्देमित्राच्या वडिलांनीच विशाखाला संपवलेमुलाशी प्रेमसंबंध मान्य नसल्याने मुंबईतून येऊन केला खून

देवरूख : आपल्या मुलाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मित्राच्या वडिलांनीच विशाखा अजय महाडीक (१८, कसबा) हिचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मित्राचे वडिल सुनिल रामचंद्र गुरव (४७, चेंबूर, मुंबई, मूळ फणसवणे गुरववाडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.विशाखा महाडीक (१८, कसबा) ही तरूणी ०१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाला जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र ती सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिचा शोध सुरु झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील मोगरवणे खांबटमाळ या ठिकाणी बुधवारी सकाळी एका अज्ञात तरूणीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी बेपत्ता तरूणींचा शोध घेतल्यानंतर विशाखा महाडीक हिचे नाव पुढे आले. पोलिसांनी तिच्या आईवडिलांना बोलावून मृतदेह दाखवल्यानंतर तो आपल्या मुलीचाच असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी मित्र-मैत्रिणींची चौकशी सुरु केली. मित्रांची तपासणी सुरु असतानाच मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र सुनील गुरव याच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने विसंगत माहिती दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने आपणच विशाखा हिचा खून केल्याचे मान्य केले.विशाखा महाडीक व आपला मुलगा महेंद्र यांच्यात प्रेमसंबंध होते. त्याची कुणकुण आपल्याला लागली होती. हे प्रेमसंबंध आपल्याला मान्य नव्हते. म्हणून विशाखा हिला संपवायचेच, या हेतूने आपण मुंबईतून गावी आलो होतो.

आपण १ डिसेंबर रोजी विशाखा हिला देवरूख बसस्थानकावर बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका रिक्षातून मोगरवणे येथील जंगली भागात नेले. त्याठिकाणी तिला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि ओढणीने गळा आवळून तिला ठार केल्याचे त्याने सांगितले.दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सुनील गुरव याला भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी