शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी आरटीओ कार्यालयात मोफत वाय फाय, ऑनलाइन सेवा जलद गतीने मिळणार 

By शोभना कांबळे | Updated: May 4, 2023 17:32 IST

मोबाइल नेटवर्कच्या अडचणीमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेची गैरसाेय होत होती

रत्नागिरी : ऑनलाइन सुविधा देताना नागरिकांना येणाऱ्या नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोफत वाय फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनापासून ही सुविधा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांची कामेही जलद गतीने होत आहेत.राज्याचा परिवहन विभागही आता ‘हायटेक’ झाला आहे. या विभागाच्या सुमारे ५८ सेवा ‘सारथी’ प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा याची बचत होत असून, कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आता वाचले आहेत. नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे या विभागाचे कामही गतिमान झाले आहे.मात्र, मोबाइल नेटवर्कच्या अडचणीमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेची अतिशय गैरसाेय होत होती. ही गैरसोय दूर करण्याच्या हेतूने येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी कार्यालयात १ मे पासून मोफत वाय फाय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधेमुळे ऑनलाइन सेवा जलद गतीने मिळणार आहेत.

आरटीओ कार्यालयाच्या बहुतांश सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे या सेवा देताना अनेक अडचणी येत होत्या. तसेच नागरिकांचीही गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र दिनी कार्यालयात मोफत वाय फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. - जयंत चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRto officeआरटीओ ऑफीसWiFiवायफाय