शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:43 IST

समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य प्रकल्प सुकाणू समितीच्या बैठकीतही या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांचा समावेशप्रकल्प अहवालास जागतिक बँकेची मान्यता : बेचाळीस कोटी एकोणचाळीस लाखाच्या खर्चास मंजुरी

विहार तेंडुलकर रत्नागिरी : समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य प्रकल्प सुकाणू समितीच्या बैठकीतही या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.

समुद्रकिनारी चक्रीवादळाचा असलेला धोका ध्यानी घेऊन कोकण विभागातील चार जिल्ह्यात चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ४२ कोटी ३९ लाख ४७ हजार ८१८ रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील ११ ठिकाणी ही बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. हे काम पुढील १८ महिन्यात म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार असून, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पासाठी राज्य प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत कामांना मान्यता देण्यात आली आहे.

चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून प्रकल्प अहवाल मागवण्यात आला होता. तो प्राप्त झाल्यानंतर आता ही केंद्र उभारण्याच्या कामांना तसेच प्रशासकीय खर्चाला मंजुरी मिळाली आहे.या अकरा ठिकाणी उभारली जाणार केंद्ररत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यातील काळेथर, आचरा, जामसंडे, विजयदुर्ग, सैतवडे, हर्णै, एडवण, दिघी, दाभोळ, बोर्ली, उसरणी अशा अकरा ठिकाणी ही केंद्र उभारली जाणार आहेत. 

टॅग्स :Cyclone Titliतितली चक्रीवादळRatnagiriरत्नागिरी