शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 13:39 IST

रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देचार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...परिसर विकास अंतिम टप्यात

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

दुरूस्तीच्या कामकाजामुळे राजवाड्यातील म्युझियमची वरच्या मजल्यावरील केवळ चार दालने पर्यटकांसाठी खुली असली तरी राजवाड्याचा बहुतांश भाग दुरूस्तीच्या नावाखाली गेली चार वर्षे बंद ठेवण्यात आला आहे. परंतु येत्या वर्षभरात कामे तातडीने पूर्ण करून पर्यटकांसाठी संपूर्ण राजवाडा खुला करण्यात येणार आहे.

थिबा राजवाडा दुरूस्तीसाठी पाठविण्यात शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला तीन वर्षानंतर (२०१४-१५) मान्यता मिळाली होती. दुरूस्तीसाठी २ कोटी १७ लाख १२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला व टप्याटप्याने दुरूस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात सुमारे १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आला. दुसऱ्या टप्यातील दुरूस्तीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असले तरी आतापर्यत २ कोटी ३५ लाखाचा खर्च करण्यात आला आहे. दोन्ही टप्प्यात छप्पर दुरूस्ती, कौले बदलणे, गच्ची, सज्जे, खिडक्या, जिने व पानपट्टी, पन्हळची कामे करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार संपूर्ण लाकडी काम सागवानी लाकडामध्ये करण्यात आले ेआहे.

परिसर विकास अंतिम टप्यातदोन टप्यातील दुरूस्ती पूर्ण झाली असून परिसर विकास सुरू आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, चौकीदार केबीन, प्रसाधन गृहे, पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उपाहारगृह, वाहन पार्किंग व्यवस्थेचे काम अद्याप सुरू आहे.

ऐतिहासिक राजवाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. परिसर विकासाचे कामही सध्या अंतिम टप्यात आहे. राजवाड्याच्या मागील बाजुला असणारे संग्रहालय पाहता येत असले तरी राजवाड्याचा मुख्य प्रसाद मात्र पाहता येत नसल्याने बाहेरूनच दर्शन घेवून माघारी फिरावे लागत होते. परंतु आता लवकरच राजवाडा सर्वांसाठी खुला केला जाणार आहे.ब्रम्हदेशच्या राष्ट्राध्यक्षांची भेटब्रम्हदेश राजघराण्यातील काही वंशज व राष्ट्राध्यक्षांनी पाच वर्षापूर्वी रत्नागिरीत येऊन थिबा राजवाडयाची पहाणी केली होती. त्यावेळी थिबाच्या समाधीचेही दर्शन घेतले होते. राजवाडयांची परिस्थिती पाहून त्यांनी दुरूस्तीसाठी निधी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र शासनातर्फे दुरूस्ती सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती.

तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी स्वत: राजवाड्याची पाहणी करून राजवाडा दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर कामांना बऱ्यापैकी वेग आला. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनीही आॅक्टोबरमध्ये पदभार स्विकारल्यानंतर राजवाड्याला भेट देवून विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना केली आहे.राजवाडयात सीसीटीव्हीसुरक्षिततेच्या पार्श्वभूमिवर राजवाडा व परिसरात शंभर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आतापर्यत २६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय पुरातत्व विभागातर्फे राज्यातील १२ वस्तू संग्रहालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेराखाली थिबा राजवाडा आल्याने राजवाडा,परिसर सुरक्षित झाला आहे. येत्या काही दिवसात राजवाड्यातील अन्य खोल्यांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

परिसर विकासाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. दालनाच्या सुशोभिकरणासाठी ९० लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या वर्षभरात प्रत्येक दालन सुशोभित करून संग्रहालय मांडले जाणार आहे. त्यानंतरच राजवाडा शंभर टक्के पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. यासाठी अजून वर्षभराचा तरी कालावधी लागण्याची शक्यता आहे- ऋत्विज आपटे,जतन सहाय्यक, पुरातत्व विभाग.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसRatnagiriरत्नागिरी