शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! वैभव खेडेकर यांचा गुरुवारी भाजप प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:11 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चौघा नेत्यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते

खेड : येथील माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. ते ४ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले.मंत्री राणे यांनी सोमवारी दुपारी १ वाजता खेडला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राजवैभव प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक गणपतीला तसेच वैभव खेडेकर यांच्या भडगाव येथील निवासस्थानीही त्यांनी बाप्पांचे दर्शन घेतले.वैभव खेडेकर यांच्यासह मनसे उपजिल्हा प्रमुख संतोष नलावडे, तालुकाध्यक्ष नीलेश बामणे, सुबोध जाधव, अविनाश सौंदळकर हे पदाधिकारी ४ सप्टेंबर रोजी हाती कमळ घेणार आहेत, असे मंत्री राणे यांनी सांगितले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २५ ऑगस्ट रोजी कोकणातील नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. हा निर्णय मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी जाहीर केला.या कारवाईनंतर वैभव खेडेकर कोणती राजकीय भूमिका घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. मात्र त्याला कोणताही दुजोरी मिळत नव्हता. बडतर्फीनंतर त्या चर्चेला पुन्हा उजाळा मिळाला आणि आता मंत्री राणे यांच्या घोषणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.