शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला विसरून चिपळूणकर खरेदीसाठी बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:28 IST

ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा घटल्याने जनमानसात त्याची भीतीही कमी झाली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी येथील बाजारपेठेत होणारी तोबा गर्दी त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. मात्र ही खरेदी करताना ग्राहकांकडून शासनाचे आदेश आणि सूचनांची पायमल्ली सुरू असून सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा रस्त्यालगत फटाक्यांचे स्टॉल

चिपळूण : ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा घटल्याने जनमानसात त्याची भीतीही कमी झाली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी येथील बाजारपेठेत होणारी तोबा गर्दी त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. मात्र ही खरेदी करताना ग्राहकांकडून शासनाचे आदेश आणि सूचनांची पायमल्ली सुरू असून सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला आहे.कोरोनामुळे गेले आठ महिने सर्वच सण व उत्सवांवर मर्यादा आली होती. मात्र ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कोरोना बाधितांची संख्या घटल्याने नागरिक दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे दिवाळी सण साधेपणात व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करावा, अशा सक्त सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत.

मात्र नागरिकांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू, साहित्य खरेदी करताना या नियमांचे व सूचनांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी रस्त्यांलगत आपला माल व साहित्य विक्रीसाठी ठेवला आहे. त्यातच शेकडो दुचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत.येथील बाजारपेठेतील चिंचनाका, जुना बस स्थानक, भाजी मंडई, गांधी चौक, गल्ली, नाथ पै चौक परिसरात मोठी गर्दी होऊ लागली आहे. यावर्षी रस्त्यालगत फटाक्यांचे स्टॉल उभारलेले नाहीत. ठराविक दुकानांमधून फटाके विक्री सुरू आहे. त्यामुळे तेथेही गर्दी होत आहे.

अजूनही कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे सणानिमित्त घराबाहेर पडून नागरिकांनी गर्दी करू नये. उलट अशा परिस्थितीत केवळ व्यापारीच नव्हे तर नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी. अजूनही काही प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने प्रत्यकाने काळजी घेणे गरजेचे आहे.जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, चिपळूण.

टॅग्स :DiwaliदिवाळीChiplunचिपळुणMarketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी