शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांसाठी खुशखबर! मेमू रेल्वे उद्यापासून प्रथमच रत्नागिरीपर्यंत धावणार

By मनोज मुळ्ये | Updated: September 12, 2023 17:36 IST

मेमू स्पेशल गाडीचे थांबे अन् वेळ जाणून घ्या

रत्नागिरी : या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पहिल्यांदाच दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू रेल्वेची पहिली फेरी बुधवारी (१३ सप्टेंबर) धावणार आहे. दि. २ ऑक्टोबरपर्यंत ही गाडी दररोज धावणार आहे. या गाडीला आधी देण्यात आलेल्या थांब्यांमध्ये रायगडमध्ये सापे वामने, करंजाडी तसेच खेड तालुक्यात अंजनी हे आणखी दोन थांबे वाढवण्यात आले आहेत.नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षी गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी १५६ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गणेशाेत्सवात मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. याआधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र, आता गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमू स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत.

दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी ०११५३/०११५४ या क्रमांकासह धावणार आहे. दि. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत या गाडीच्या ३९ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी ७:१० वाजता ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीसाठी सुटणार आहे. ती दुपारी २:५५ वाजता रत्नागिरीत पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३:४० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल.मेमू स्पेशल गाडीचे थांबेरोहा, माणगाव, वीर, सापे, वामने, करंजाडी, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेMumbaiमुंबई