शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

तेजस एक्स्प्रेसमधील 15 प्रवाशांना जेवणातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 17:19 IST

देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणाऱ्या कोकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये जेवणातून 15 प्रवाशांना विषबाधा झाली आहे.

रत्नागिरी : देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणाऱ्या कोकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये जेवणातून 15 प्रवाशांना विषबाधा झाली आहे. प्रवाशांना त्रास होऊ लागल्यानं तेजस एक्स्प्रेस चिपळूण स्थानकाजवळ थांबवण्यात आली आहे. या प्रवाशांना उपचारासाठी चिपळूणमधील लाईफकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशातील वेगवान एक्स्प्रेस म्हणून तेजस एक्स्प्रेस ओळखली जाते. करमाळीहून दर रविवारी तेजस सीएसटीच्या दिशेनं धावते. आज सकाळी आपल्या नियोजित वेळी तेजस निघाली मात्र चिपळूणजवळ पोचताच काही प्रवाशांना फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ लागला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तेजस एक्सप्रेस ही प्रवाशांना विमानप्रवासाचा फील देणारी, अत्याधुनिक ट्रेन आहे. तेजस एक्सप्रेस अगदी कमी वेळेतच लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेकडून 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसंच या ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे, डब्ब्यांमझ्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग या सगळ्या सुविधा प्रवाशांना अनुभवायला मिळत आहेत.

‘तेजस’मध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीत 56 सीट आणि एसी बोगीत 936 सीट आहेत. प्रत्येक डब्यात 6 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अल्पोपहाराची सेवाही उपलब्ध करून दिली आहे. आयआरसीटीसीकडून ही सेवा सशुल्क देण्यात येणार आहे. ‘तेजस’मध्ये सायंकाळच्या अल्पोपहारात दाबेली, डाएट चिवडा, सामोसा, कोथिंबीर वडी मिळते. सकाळी ब्रेड बटरसह उपमा, पोहे, इडली, वडा मिळतो.

काय आहे तेजस एक्स्प्रेस?200 किमी प्रतितास वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली ट्रेन आहे. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेला 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करावे लागले आहे. याचे दरवाजे स्वयंचलित आहेत. शिवाय यात सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग इत्यादी सुविधाही आहेत. ही ट्रेन आठवड्याच्या पाच दिवस धावणार धावते. ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत. तेजस एक्स्प्रेस अवघ्या 8.30 तासात गोव्यातील करमाळी स्टेशनवर पोहोचते. तर पावळ्यात कोकणातील परिस्थिती पाहता ट्रेनला करमाळीला पोहोचण्यासाठी 10.30 तास लागतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे