उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय तज्ज्ञ समिती येत्या बुधवारी चिपळुणात दाखल होणार, तीन दिवस चौकशी करणार

By संदीप बांद्रे | Published: October 23, 2023 02:18 PM2023-10-23T14:18:44+5:302023-10-23T14:20:14+5:30

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी चौकशीसाठी जाहीर करण्यात आलेली केंद्रीय तज्ज्ञ चौकशी समिता दौरा कार्यक्रम ...

Flyover accident: The central expert committee will enter Chiplun next Wednesday and will investigate for three days | उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय तज्ज्ञ समिती येत्या बुधवारी चिपळुणात दाखल होणार, तीन दिवस चौकशी करणार

उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय तज्ज्ञ समिती येत्या बुधवारी चिपळुणात दाखल होणार, तीन दिवस चौकशी करणार

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी चौकशीसाठी जाहीर करण्यात आलेली केंद्रीय तज्ज्ञ चौकशी समिता दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 25 ऑक्टोबरपासून तीन दिवस ही समिती या कोसळलेल्या पुलाची चौकशी करणार आहे.  

उड्डाणपूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पहाटे येथील बहाद्दूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली व या उड्डाणपुली राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या तीन तज्ज्ञ समितीकडून तपासणी करण्यो जाहीर केले होते. त्यानुसार आयआयटी रवी सिन्हा, टंडन कन्सल्टनसो मनोघ गुप्ता, हेगडे कन्सल्टनसो सुब्रमण्य हेगडे या तीन तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

केंद्रीय समितीच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहिर झाला असून ही समिती  25 ऑक्टोबर रोजी येथे दाखल होणार आहे. त्यानंतर 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी कोसळलेल्या पुलाचे ही समिती ऑडीट करणार आहे.  ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे असल्याने त्यादृष्टीने तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करुन अहवाल देईल. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे यापुर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेले आहे.

Web Title: Flyover accident: The central expert committee will enter Chiplun next Wednesday and will investigate for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.